Manoj Jarange | “मराठ्यांशी गद्दारी करालं, तर….”; मनोज जरांगेंचा मुंबईत आंदोलनाचा इशारा

Manoj Jarange | मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. याशिवाय त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लवकरच आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिली. कितीही ताकद लावू पण आणि आरक्षण मिळवणारच, असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले.
“लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण केले, शांतपणे आंदोलन केले. पण आता 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या एक महिन्यात गाठी भेटी नियोजन करणार आहे. थेट गावातील अडचणी समजून घेणार आहोत. या काळात छत्रपती भवन, शहागड पैठण फाटा या ठिकाणी अडचणी घेऊन या. एक महिन्यात राज्यातील गावा गावातील अडचणी छत्रपती भवन येथे सोडवल्या जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
लवकरच आझाद मैदानात आंदोलन करु. आता समोरासमोर आंदोलन करण्यात येईल असे जरांगे पाटील म्हणाले. कुणबी आणि मराठा एकच आहेत आणि हे विदर्भ आणि खानदेशमधील मराठ्यांनी लक्षात ठेवावे. तसेच मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळ भोगायला तयार रहा, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. Manoj Jarange Patil |
फडवणीस यांना बापाची माया, पण आमच्या लेकरांच्या…
“फडवणीस यांना बापाची माया आहे हे काल दिसून आली. मुलीची परीक्षा झाल्यावर वर्षा बंगल्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेक काय असते तुम्हाला कळाले, आमच्या लेकरांच्या आत्महत्या झाल्या, हे तुम्हाला का कळत नाही, आमच्या लेकरांची माया का येत नाही? आरक्षण का देत नाही? स्वतःच्या मुलीचा शब्द मोडत नाहीत. तुम्ही आमचे EWS घालवले आणि खापर आमच्यावर फोडतात. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, हा भेदभाव का? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा:
प्रसिद्ध कॉमेडियनला सोलपुरात मारहाण; वीर पहारियाने पोस्ट शेअर करत दिले स्पष्टीकरण…





