मुंबई : बॉलिवुडमध्ये 2019 तारा सुतारियाने “स्टूडेंट ऑफ द इयर-2′ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये पाउल ठेवले होते. यात तिच्यासोबत टायर श्रॉफने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडेनेही डेब्यू केले होते.
View this post on Instagram
ताराने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी टेलिव्हिजनवर काम केलेले होते. आतापर्यत ती दोन चित्रपटात झळकलेली आहे. “स्टुडेंट ऑफ द इयर’नंतर तिने “मरजावा’ चित्रपटात एका मुक मुलीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
गुगलने 2019मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्यांची यादी जाहीर केली असून यात काही बॉलिवुडमधील कलाकारांचीही नावे आहेत. बॉलिवुडमधील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्यांमध्ये तारा सुतारियाचे नाव आघाडीवर आहे. ती नेहमीच तिच्या फोटो शूटमुळे चर्चेत येत असते.
View this post on Instagram
नुकतेच ताराने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यांची खूप चर्चा होत आहे.ताराने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. यात तिने काळा चष्माही लावला आहे.