‘ब्राऊन मुंडे..’ म्हणून जगप्रसिद्ध होणाऱ्या रॅपर एपी ढिल्लनचा जीवनप्रवास उलगडणार ! डॉक्युमेंट्रीचा टीजर रिलीज VIDEO

मुंबई – बहुप्रतिक्षित डॉक्यू सीरीज- ‘एपी ढिल्लों’: फर्स्ट ऑफ ए काइंडची एक खास झलक रिलीज केली आहे. ही डॉक्युमेंट्री प्राइम व्हिडिओवर लवकरच पाहायला मिळणार आहे. या डोक्युमेंट्रीमधून एपी ढिल्लनचा सुपस्टार ते जागतिक संगीत आयकॉन होण्यापर्यंतचा प्रवास उलगडणार आहे.
‘ब्राऊन मुंडे’ या प्रसिद्ध गाण्यामुळे जगभर हिट झालेल्या एपी यांचा प्रवास मोठा रंजक असल्याचे समजते. त्यांच्या गाण्याच्या आवडीपासून ते सुपरस्टार होण्यापर्यंत त्यांची कहाणी आता सर्वसामान्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वाइल्ड शीप कंटेंट आणि रन-अप रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने पॅशन पिक्चर्स निर्मित, मालिका दिग्दर्शन जय अहमद यांनी केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या डॉक्यु सिरीजची सर्वांनाच उत्सुकता होती.जगभरातील एपी फॅन्स आपल्या स्टारचा प्रवास आणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणूनच रिलीज करण्यात आलेला टीजर चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. ही डॉक्यू सीरीज 18 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओवर भारतात आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रीमियर होईल.
कोण आहे एपी ढिल्लन
एपी ढिल्लन हा पंजाबी संगीत उद्योगाशी संबंधित पंजाबी गायक, गीतकार आणि निर्माता आहे. सादा प्यार, बहाना, माझाइल, ब्राउन मुंडे या गाण्यांसाठी ते ओळखले जातात. त्यांची माझाइल आणि ब्राउन मुंडे ही दोन गाणी जागतिक हिट आहेत.





