Shaurya Pradeep Patil : देशाची राजधानी दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून प्लॅटफॅार्मवर उडी मारून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्यांने आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली. शौर्य प्रदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील इयत्ता दहावीत शौर्य शिकत होता. शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील होता. पण गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे वडील प्रदीप पाटील दिल्लीत स्थायिक झाले. या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शौर्यच्या आई वडिलांसह त्याच्या नातेवाईंकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे. या सुसाईड नोटमधील शब्द मन सुन्न करणारे आहेत. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली. शौर्य नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता शाळेसाठी घरातून निघाला होता. दुपारी अचानक त्यांचे वडील प्रदीप पाटील यांना फोन आला आणि त्यांचा मुलगा मेट्रो स्टेशनवरून पडला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पण त्याअगोदरच शौर्याला डॅाक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे त्याचे वडील प्रदीप पाटील यांच्यावर मोठा आघात झाला आहे. शौर्यच्या शाळेच्या बॅगेतून मिळालेल्या सुनाईट नोटमधून आई-वडिलांची माफी मागितली आणि लिहिले की, “माझे अवयव गरजूंना दान करा.” शाळेतील काही शिक्षक आणि प्रिंसिपल यांनी सतत छोट्या-छोट्या कारणांसाठी मानसिक छळ केला. “त्यांच्यामुळे मी हे पाऊल उचलतोय. त्यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही मुलाला असा त्रास होऊ नये.” असे शौर्यने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची चौकशी सुरू आहे. मागील चार-पाच दिवसांपासून एका शिक्षिकेने शौर्यला सतत धमकी दिली होती. “तुझ्या पालकांना बोलावून तुझं दाखला काढून टाकेन.” शौर्यची सुसाईड नोट “मेरा नाम शौर्य पाटील हैं… आय अॅम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं. स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू.” असे त्याने शौर्यने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. हेही वाचा : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ; पंतप्रधानांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित