स्पर्धेत जिला सर्वांसमोर ‘मूर्ख’ म्हटलं तिच ठरली ब्युटी क्वीन ! Miss Universe 2025ची विजेती ‘फातिमा बॉश’ कोण आहे?

Fatima Bosch | Miss Universe 2025 Winner : ‘मिस युनिव्हर्स 2025′ स्पर्धेचा बहुचर्चित निकाल जाहीर झाला असून, मेक्सिकोची ‘फातिमा बॉश‘ हिने यंदाचा मानाचा मिस युनिव्हर्स किताब पटकावला आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणारी ‘मनिका विश्वकर्मा’ यंदाच्या स्पर्धेत टॉप 12 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. एकूण 130 देशांतील स्पर्धकांनी या जागतिक सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. मनिकाकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.
वादानंतरही विजेतेपदाची कमान :
२५ वर्षीय फातिमा बॉश ही सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय असून तिचे 1.8 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. मॉडेलिंग करतानाचे तिचे अनेक फोटो, कुटुंबासहचे क्षण आणि बालपणीच्या आठवणी ती नियमितपणे चाहत्यांसोबत शेअर करते.
स्पर्धेच्या काही दिवस आधी फातिमा मोठ्या वादात सापडली होती. ४ नोव्हेंबर रोजी सॅशिंग सेरेमनी होती. या सेरेमनती फातिमा बॉशचा थायलंडचे पेजंट डायरेक्टर नवात इत्साराग्रिसिल यांच्याशी वाद झाला होता. नवात यांनी फातिमाला ‘मूर्ख’ म्हटलं होतं.
“Quiero que todas las mujeres y niñas, sepan que son suficientes, que sepan que hay belleza en sus almas, que no sientan miedo de ser quienes quieran ser”
Fátima Bosch sigue avanzando, México ya entró al top 15. Eso!#missuniverse2025 #MissUniverse pic.twitter.com/j721folibh
— marea 🌊 (@SoleSurvivoor) November 21, 2025
फातिमा थायलंडला प्रमोट करणाऱ्या पोस्ट करत नाही, असा दावा त्यांनी केला आणि तिला मूर्ख म्हटलं. यामुळे फातिमा संतापली. नवात महिलांचा आदर करत नसल्याचं ती म्हणाली.
यानंतर नवात त्यांनी सिक्युरिटीला सांगितलं की फातिमाला बाहेर काढण्यात यावं. अपमान झाल्यावर फातिमा भडकली आणि ती स्पर्धा सोडून निघून गेली होती. या वादानंतर फातिमा या स्पर्धेची विजेती झाल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
फातिमाने पत्रकारांना म्हटले, “डायरेक्टरने माझा केलेला अपमान योग्य नव्हता. त्यांनी मला ‘बेवकूफ’ म्हटले. जगाने हा अन्याय पाहणे गरजेचे आहे. आम्ही मजबूत स्त्रिया आहोत आणि हा मंच आमची आवाज उठवण्याची जागा आहे.”
अनेक स्पर्धकांनी तिच्या पाठिशी उभे राहत एकजूट दाखवली. त्यानंतर होस्ट नवात यांनी त्यांना चेतावणी दिली, “जर स्पर्धेत राहायचे असेल तर बसा.”
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा :
या वादानंतर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी फातिमा बॉश यांच्या धैर्याचं कौतुक करत म्हटले, “स्त्रियांना अन्यायाचा सामना करावा लागला तर त्यांनी आवाज उठवावा. फातिमा याबाबत एक उत्तम उदाहरण आहेत.
विजेत्यांचा क्रम :
विजेती : फातिमा बॉश (मेक्सिको)
फर्स्ट रनर-अप : प्रवीणर सिंह (थायलंड)
सेकंड रनर-अप : स्टेफनी अबासाली (व्हेनेझुएला)
टॉप फायनलिस्ट : अहतिसा मनालो (फिलीपाईन्स)
टॉप फायनलिस्ट : ओलिविया यासे (आयव्हरी कोस्ट)
बक्षिसाची रक्कम किती?
मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने या वर्षीच्या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, विजेत्याला सुमारे २,५०,००० डॉलर्स देण्यात येतील. ही रक्कम २०२४ च्या विजेत्या व्हिक्टोरिया केजरला देण्यात आलेल्या रकमेइतकीच आहे.
बक्षिसाबरोबरच यंदाच्या मिस युनिव्हर्सला महिन्याला ५०,००० डॉलर वेतन दिले जाते. हे वेतन प्रवास, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती आणि मिस युनिव्हर्स ब्रँड अंतर्गत केलेल्या इतर अॅक्टिव्हिटीजसाठी असते.





