मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) आपली कंबर कसली असून, प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी आज जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने ही यादी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या यादीत पक्षाच्या दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. प्रमुख स्टार प्रचारकांमध्ये अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, नवाब मलिक, मुश्ताक अंतुले, अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, राजेंद्र जैन, सिद्धार्थ टी. कांबळे, लहुजी कानडे, सुनिल मगरे, महेश शिंदे, सुरेखाताई ठाकरे, प्रतिभा शिंदे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव-पाटील, अण्णा बनसोडे, इंद्रनील नाईक, अनिल पाटील, प्रताप पाटील चिखलिकर, सयाजी शिंदे, समीर भुजबळ, सना मलिक, इत्रिस नायकवाडी, इशान सिद्दीकी, शरद पाटील, सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, नाझेर काझी, राजलक्ष्मी भोसले, नजीब मुल्ला, विकास पासलकर यांचा समावेश आहे.