Shraddha Aarya | ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र आता लग्नानंतर ३ वर्षांनी श्रद्धाच्या घरी पाळणा हलणार आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. यानंतर आता श्रद्धा तब्बल साडेसात वर्षांनंतर या लोकप्रिय शोला अलविदा केला आहे.
श्रद्धाने या पोस्टद्वारे कुंडली भाग्य मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितले आहे. वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेत काम करणार नसल्याचं तिने स्पष्ट केले आहे.
श्रद्धा आर्याने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहीले की, “तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु मी २५ वेळा कॅप्शन लिहून डिलीट केलं आहे. कारण माझ्याकडे शब्दच नाही. ज्याद्वारे मी व्यक्त होऊ शकेन. ते क्षण जेव्हा मी माझ्या आयुष्यातील यश, समाधान अनुभवलं आता मी या कामातून ब्रेक घेत आहे. ‘कुंडली भाग्य’ सिरिअलने मला खूप काही दिले आहे. एक अल्लड मुलगी त्यानंतर लग्न आणि आता जबाबदार आई असा तो प्रवास होता. त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच की हा प्रवास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे.” Shraddha Aarya |
View this post on Instagram
पुढे अभिनेत्रीने लिहिले की, “प्रीताची साडेसात वर्षे, फॅन्सी कपडे, प्रसिद्धी, लोकप्रियता, अप्रतिम टीम आणि सहकलाकार, प्रवास, ग्लॅमर, आव्हानात्मक दृश्ये, नृत्य, नाटक आणि कलाकाराचे आयुष्य परिपूर्ण बनवणारं सर्व काही माझ्यासाठी परीकथेपेक्षा कमी नव्हतं”, असे तिने म्हंटले आहे. Shraddha Aarya |
याशिवाय तिने एकता कपूरसह पडद्यामागच्या सर्व कलाकारांचे आभार मानले आहे. जीवनाच्या या अद्भुत अनुभवासाठी माझी निवड केल्याबद्दल एकता कपूरचे आभार! झी टीव्ही, माझे सर्व सह-कलाकार, शोचे क्रू, दिग्दर्शक, लेखक, सिनेमॅटोग्राफर, प्रॉडक्शन हेड, स्टायलिस्ट, ब्युटीफाइंग टीम, स्पॉट दादा यांच्यामुळे हा प्रवास सहज, यशस्वी, आरामदायक आणि खूप आनंदी झाला, असे म्हणत तिने सर्वांचे मनापासून आभार मानले, तिच्या पोस्टनंतर चाहत्यांनीही तिच्या पुढील नव्या सुरूवातीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:
“आज तुझा मर्डर फिक्स” ; सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना उघडउघड धमकी