पुणे जिल्हा | ज्ञानेबा माऊलीच्या जयघोषाने कडूस दुमदुमले

कडूस, (वार्ताहर) – डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, खांद्यावर भागवत धर्माची पताका, गळ्यात टाळ, मुखी हरिनामाचा गजर करत, ज्ञानोबा तुकोबा जयघोष करीत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कडूस ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 29) सकाळी दहा वाजता प्रस्थान झाले.
सुदाम मुसळे, बबन गणपत मेदगे, दिंडी प्रमुख, अध्यक्ष गोविंद नेहेरे, सचिव प्रभाकर सुकाळे, खजिनदार, मारूती नेहेरे सचिव, उत्तरेश्वर दिंडी अध्यक्ष फक्कड पितांबरे, सचिव लक्ष्मण शेटे, मारुती जाधव, विणेकरी सुदाम मुसळे, बबन मेदगे, चोपदार बाजीराव ढमाले आदीसह मान्यवरांनी पूजन करून भजन करण्यात आले.
ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात, गावाला प्रदक्षिणा घालून दोन्ही पालख्यां देहूकडे मार्गस्थ झाल्या. दिंडी सोहळ्याचे आयोजन वै. साधुवर्य गंगाजीबुवा मवाळ ज्येष्ठ नागरिक मंडळकडूस आणि उत्तरेश्वर दिंडी कडूस यांच्यावतीने करण्यात आले.
प्रस्थान सोहळ्यासाठी उद्योजक आभिनाथ शेंडे, संजय घनवट, संतोष ढमाले, तात्यासाहेब धायबर, चांगदेव ढमाले, पंडित मोढवे, बाळासाहेब मंडलिक, सोपान पानमंद, दादाभाऊ ढमाले, भगवान सा. ढमाले, पंडित नेहेरे, पंडित पोटे, शांताराम अभंग, शांताबाई खंडागळे, बबन शिंदे आदी मान्यवर दरवर्षाप्रमाणे उपस्थित होते.
धर्मशाळेचे बांधकाम सुरू
कडूस येथील गंगाजीबुवा मवाळ ज्येष्ठ नागरिक मंडळा यांनी पंढरपूर येथील जुना अकलूज रस्त्याजवळ खरेदी केलेल्या जागेवर नविन धर्मशाळेचे बांधकाम सुरू झाले आहे, अशी माहिती तुकाराम बंदावणे यांनी दिली.





