पुणे जिल्हा | रामकृष्ण पतसंस्थेकडून पाच टक्के लाभांश

कडूस, (वार्ताहर) – येथील रामकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने एकमुखी सभासदांना पाच टक्के लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब गारगोटे यांनी दिली.
रामकृष्ण ग्रामीण पतसंस्थेच्या24 व्या वार्षिक सर्वसाधारण नुकतीच पार पडली, त्यावेळी वरील निर्णय जाहीर करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष बाजीराव ढमाले, तुकाराम ढमाले ,प्रकाश कालेकर,भाऊ गारगोटे अरगडे बबन, रभाजी शिंदे, चांगदेव ढमाले, भगवान ढमाले, पंडित नेहेरे, वडगावचे सरपंच कैलास गायकवाड, अध्यक्ष संतोष तोत्रे, दत्ता बंदावणे, ज्ञानेश्वर ढमाले, प्रशांत गारगोटे तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब गारगोटे म्हणाले की, लहान व्यवसायिक, अल्प भूधारक शेतकरी आणि सभासदांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अडचणीत कर्ज उपलब्ध करून पतसंस्थेच्या 598 हितचिंतक सभासदांना सहकार्य करणे हिच पतसंस्थेची ओळख आहे.
पुढील वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेत संगणीकृत वापर, स्वतंत्र इमारत आणि सामाजिक उपक्रमात पतसंस्थेचा सहभाग आदीबाबी विचारांधीन असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे व्यवस्थापक जितेंद्र काळोखे यांनी लेखाजोखा मांडून सभासदांच्या शंकांचे योग्य रितीने निरसन केले.





