पुणे जिल्हा | कडूसला तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा

कडूस,(वार्ताहर) – श्रीक्षेत्र कडूसच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे, रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या मैदानावर (दि. 20)तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
जिल्हा परिषद पुणे तसेच खेड तालुका क्रीडा संघटना आणि रामभाऊ म्हाळगी विद्यायाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.
यावेळी सरपंच शहनाज तुरूक उपसरपंच रंजना पानमंद, माजी उपसरपंच अनिकेत धायबर, संस्था अध्यक्ष अशोक गारगोटे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शंकर ढमाले, भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित शेंडे, अशोक बंदावणे,
सदस्य गणेश मंडलिक, हेमलता खळदकर, सुधा पानमंद, विजया नाईक, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चांगदेव ढमाले,संजय जाधव, दिपाली जगताप, सुनंदा गारगोटे,कल्पना शेजवळ,अजिज शेख, बाळासाहेब बोंबले, मुख्याध्यापक अनिल पोटे, क्रीडा शिक्षक रामदास रेटवडे,जिल्हा व तालुका क्रीडा संघटनांचे अधिकारी ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून रामभाऊ म्हाळगी विद्यालयास ओपन जिमसाठी 5 लाख 50 हजार व कबड्डी मॅटसाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.





