Marathwada Mukti Sangram Day 2022 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
Updated On:

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती लढा हा प्रदीर्घ लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात व अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढ्यातील सर्व हुतात्म्यांना आपली भावपूर्ण आदरांजली वाहतो.
या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरूवात होत आहे. राज्यातील सर्व जनतेला तसेच आज जगभर विखुरलेल्या मराठवाड्यातील बंधू – भगिनींना मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.





