नेवासा : पंचायत समिती म्हणजे गावाकडच्या मातीशी अन् बळी राजाशी नाळ जोडलेले कार्यालय याची जाणीव ठेवत नेवासा पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी पुत्र असलेले सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने वर्षभर पशुसेवा करणाऱ्या पशुपालक,शेतकरी बळीराजा,पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करुन कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी बेलपिंपळगाव येथील शिंदे वस्तीवर जाऊन सर्जा-राजा या बैलजोडीची पूजा करुन बळीराजांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली आणि शिंदे कुटुंबासमवेत पुरणपोळीचाही आस्वाद घेतला. यावेळी भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब शिंदे, आबासाहेब शिंदे, सुहास मिरपगार उपस्थित होते. पाटेकर यांनी ग्राम दैवत रोकडोबा हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी सरपंच किशोर गारुळे,माजी सरपंच कृष्णा शिंदे,चंद्रशेखर गटकळ बाळासाहेब शिंदे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर पोलीस पाटील संजय साठे उपस्थित होते. तसेच कुकाणा येथील पशु चिकित्सालयात पशु सेवेतील उत्कृष्ट सेवेबद्दल पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज शिंदे व व्रणोपचारक संजय म्हस्के परिचर बाळासाहेब हिवाळे यांचा गटविकास अधिकारी पाटेकर यांनी सन्मान केला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब आगळे उपस्थित होते रस्तापुर येथील हारकळ वस्तीवर नैसर्गिक सेंद्रिय शेती करणारे दत्तात्रय शेरकर व सुंदरदास हारकळ या शेतकरी बळीराजांचा यावेळी पाटेकर यांनी सन्मान केला तसेच त्यांच्याकडून नैसर्गिक शेती बद्दल माहिती घेतली नेवासा पंचायत समितीच्यावतीने अचानक झालेल्या गौरवामुळे पशुपालक शिंदे,नैसर्गिक शेतीतज्ञ शेरकर व हारकळ कुटुंबीय तसेच पशु दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी भारावून गेले. सर्जा – राजा बैल-जोडी २२ वर्षापासून कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहे ४ वर्षापूर्वी वरघुडे वस्ती बेलपिंपळगाव येथील रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त मिरवणुकीत सर्जा-राजा बैलजोडीच्या रथाचे सारथ्य श्रीक्षेञ देवगड देवस्थानचे प्रमुख ह.भ.प.भास्करगिरी महाराज व श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले होते.सर्जा-राजामुळे शेती व कुटुंबाची भरभराट झाली सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांची अचानक भेटही विशेष आनंददायी वाटली. भाऊसाहेब गोविंदराव शिंदे, बेलपिंपळगाव ता. नेवासा. जि.अहिल्यानगर