पुणे जिल्हा दूध उत्पादन संघ कात्रजचा उपक्रम: अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे दूध उत्पादकांना मार्गदर्शन तळेगाव ढमढेरे – राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा दूध उत्पादन संघ कात्रजच्यावतीने संपूर्ण जिल्हाभर दुग्ध उत्पादक जनावरांचे मोफत तपासणी शिबिराच्या रुपाने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कात्रज दूध संघाचे चेअरमन स्वप्निल ढमढेरे यांनी शिबिराला भेट देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच तपासणी शिबिराचा आढावा घेतला. या शिबिरामध्ये रोग निदान करणे, गर्भ तपासणी, जंत व गोचीड निर्मूलन, सेंद्रिय खतांची माहिती, औषधे वाटप, कृत्रिम वीर्यदान सेवा,इनपुट विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा यांची माहिती इत्यादी सेवा ll शेतकऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शिरूर तालुका महिला अध्यक्षा आरती भुजबळ, तळेगाव ढमढेरेचे माजी उपसरपंच विजूपाटील ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस सुवर्णा भुजबळ,कोंढापुरी शीतकरण केंद्रप्रमुख दिगंबर घुले, एकनाथ नरके ,संदीप खळतकर,शेतकरी साहेबराव तोडकर ,विजय सूर्यवंशी , सामाजिक कार्यकर्ते प्रतीक, ढमढेरे निलेश, संतोष खेडकर उपस्थित होते.