मांडवगण फराटा – वडगाव रासाई (ता. शिरूर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुजित शेलार यांनी विविध उपक्रम राबवून श्रीछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा केला. वृक्षारोपण करण्यासाठी विध्यार्थ्यांना दोन हजार झाडांची रोपे व गरजू विध्यार्थ्यांना दोन हजार वाह्यांचे वाटप केले. विद्यालयाची शैक्षणिक प्रगती, भौतिक सोयी सुविधा याविषयी शाळा समिती सदस्य काकासाहेब खळदकर यांनी माहिती देत सी.एस.आर. फंडातून निधीची मागणी केली. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून विद्यालयासाठी निधीची उपलब्धता करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवी काळे यांनी दिले. महेश ढमढेरे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना शाळेसाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली. वृक्षारोपण, संगोपन, संवर्धन याविषयी मार्गदर्शन करताना यावर्षी चार लाख वृक्ष लावण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, असे उमेश रणदिवे यांनी सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष रवीबाप्पू काळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमढेरे, महिला आखाडी प्रदेश सरचिटणीस तृप्ती सरोदे, सुधीर फराटे, सरपंच सचिन शेलार, डॉ. सुजित शेलार, कुंडलिक शितोळे, राहुल रणदिवे, वीरेंद्र शेलार, काकासाहेब खळदकर, दादासाहेब ढवळे, बबनराव ढवळे, सोमनाथ शेलार, शरद साठे, डॉ. अनिल शेलार, भैय्या देशमुख, तात्या शेलार, मीनानाथ ढवळे, विलास शेलार, काकासाहेब शेलार, गव्हाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पालक, ग्रामस्थ, शिक्षक, विध्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. मगर, प्रा. गुंड, प्रा. वळवी, प्रा. मेंडके, प्रा. गायकवाड, प्रा. कांडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, तर सूत्रसंचालन चंद्रशेखर काकडे व डॉ. सुजित शेलार यांनी आभार मानले.