Prashant Jagtap : सरकारच्या निगरगट्ट धोरणाने तरुणाचा बळी: प्रशांत जगताप

Prashant Jagtap : राज्य सरकारच्या जल जीवन मिशन योजनेची कामे केल्याचे बिल थकवल्याने सांगली जिल्ह्यातली वाळवा तालुक्यातील एका तरूण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारकडून तब्बल दीड कोटींचे थकीत बिल मिळत नसल्याने ३५ वर्षीय हर्षद पाटील या तरुणाने आपल्या शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हर्षद यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तांदूळवाडी गावात शोक परसरला आहे. त्यांच्या आत्महत्येवरून आता विरोधकांकडून सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले, असल्याची टीका केला आहे.
आता याप्रकरणी शरद पवार गटाचे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ट्वीट करत सरकारला प्रश्न केले आहेत. इंजिनियर या लोकांचे पैसे देण्यासाठी त्या तरूण ठेकेदाराने कर्ज काढले. ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांनीही वसुलीसाठी तगादा लावला अखेर… सरकारच्या निगरगट्ट धोरणाने या तरुणाचा बळी घेतला, असल्याचा आरोप केला आहे. असे अनेक तरूण ठेकेदार आहेत त्यांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत. सरकार अजून किती जणांच्या मृत्यूची वाट बघणार आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
महायुती सरकारच्या निर्दयी धोरणामुळे आज एक उमद्या तरुणाला मरणाच्या दारात ढकललं… या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ! या तरूण ठेकेदाराकडून सरकारने जल जीवन मिशनची कामं करून घेतली. मात्र त्या कामाचे पैसे देण्याची वेळ येताच सरकारने चालढकल सुरू केली. अखेर कामगार, इंजिनियर या लोकांचे पैसे देण्यासाठी त्या तरूण ठेकेदाराने कर्ज काढले. ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांनीही वसुलीसाठी तगादा लावला. अखेर… सरकारच्या निगरगट्ट धोरणाने या तरुणाचा बळी घेतला…. असे अनेक तरूण ठेकेदार आहेत त्यांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत. सरकार अजून किती जणांच्या मृत्यूची वाट बघणार आहे ?
महायुती सरकारच्या निर्दयी धोरणामुळे आज एक उमद्या तरुणाला मरणाच्या दारात ढकललं… या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे !
या तरूण ठेकेदाराकडून सरकारने जल जीवन मिशनची कामं करून घेतली. मात्र त्या कामाचे पैसे देण्याची वेळ येताच सरकारने चालढकल सुरू केली. अखेर कामगार, इंजिनियर या… pic.twitter.com/U0zvRKwRSH
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) July 23, 2025
अन् त्याने मृत्यूला कवटाळलं
हर्षल पाटील हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावचे रहिवासी आहेत. हर्षल यांनी सावकाराकडून कर्ज घेत जल जीवन मिशन योजनेते काम केले होते. मात्र, काम करुनही पैसे न मिळाल्याने हर्षल हे तणावत होते. या तणावातून त्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे.





