David Warner Arrested : पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धा सुरू असताना दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner Arrested) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. आयपीएलमधून डावलल्यानंतर त्याने (David Warner Arrested) PSL मध्ये कराची किंग्स संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला संघाचे कर्णधारपदही देण्यात आले. मात्र, आता दारूच्या नशेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून त्याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? PSL मध्ये तीन सामन्यांनंतर डेव्हिड वॉर्नरने (David Warner Arrested) छोटासा ब्रेक घेतला होता. तो ३ एप्रिल २०२६ रोजी ऑस्ट्रेलियाला आपल्या कुटुंबाकडे गेला. या ब्रेकदरम्यान, ५ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी सिडनीच्या मारोब्रा येथे रँडम ब्रेथ टेस्टिंग दरम्यान त्याला पोलिसांनी थांबवले. वॉर्नरने गाडी थांबवून पार्क करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याच्या गाडीजवळ जाऊन ब्रेथ टेस्ट केली. रोडसाइड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला मारोब्रा पोलिस स्टेशनवर नेले गेले. David Warner Arrested स्टेशनवर दुसऱ्या चाचणीत त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.१०४ नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातील कायदेशीर मर्यादा (०.०५) पेक्षा हे दुप्पट आहे. यामुळे त्याच्यावर मिड-रेंज ड्रिंक ड्रायविंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले असून, त्याला ७ मे २०२६ रोजी डाउनिंग सेंटर लोकल कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मैदानातील वाद आणि व्हायरल व्हिडिओ PSL सुरू असताना वॉर्नर आधीच एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला होता. त्यात तो इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यात तीव्र वाद घालताना दिसला होता. मात्र, नंतर वॉर्नरने स्पष्ट केले की हे केवळ ‘टीम बॅन्टर’ (टीममधील मित्रत्वपूर्ण गंमत) होते आणि त्यात काही गंभीर वाद नव्हता. संघाचे हेड ऑफ स्ट्रॅटेजी हायदर अझहर यांनीही हे फक्त मित्रत्वपूर्ण विनोद असल्याचे सांगितले होते. डेव्हिड वॉर्नर आपल्या आक्रमक स्वभावामुळे मैदानात अनेकदा प्रतिस्पर्धी किंवा सहकारी खेळाडूंसोबत वादात अडकतो, अशी त्याची प्रतिमा आहे. आता मैदानाबाहेरही ही घटना घडल्याने चर्चा अधिक तीव्र झाली आहे. PSL वर काय परिणाम होणार? कराची किंग्सचा कर्णधार म्हणून वॉर्नर सध्या PSL मध्ये खेळत आहे. ब्रेकनंतर तो ९ एप्रिलच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानात परतण्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रकरणामुळे त्याच्या पुढील खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप PSL संघाने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज असून, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत.