ICC Prize Money : फक्त १३१ कोटीच नाही, तर आता ICC नेही उघडला खजिना! विश्वविजेत्या भारताला मिळाले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
ICC Prize Money : यात अपेक्षेप्रमाणे विश्वविजेत्या भारतीय संघाला सर्वाधिक वाटा मिळाला आहे.

ICC T20 World Cup 2026 Prize Money : भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीने स्पर्धेसाठी एकूण ११.२५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १०३.४६ कोटी रुपये) बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. यात अपेक्षेप्रमाणे विश्वविजेत्या भारतीय संघाला सर्वाधिक वाटा मिळाला आहे.
भारताला मिळाले २७ कोटींहून अधिक –
आयसीसीच्या नियमांनुसार, विजेत्या भारतीय संघाला २,६३९,४२३ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २७ कोटी ४८ लाख रुपये मिळतील. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला सुमारे १४.६५ कोटी रुपये दिले जातील. दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ९.२५ कोटी रुपये मिळाले आहेत, तर सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या इंग्लंडला ८.९६ कोटी रुपये मिळाले आहेत.
पाकिस्तान टॉप-५ मधून बाहेर
या स्पर्धेत सुपर-८ फेरीच्या पुढे मजल मारता न आलेल्या पाकिस्तान संघाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सर्वाधिक रक्कम मिळवणाऱ्या पहिल्या पाच संघांमध्येही पाकिस्तानला स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तानच्या पदरात केवळ ४ कोटी ८१ लाख रुपये पडले आहेत. कॅनडा, ओमान आणि नामिबिया या संघांना सर्वात कमी रक्कम मिळाली असून ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले होते.
ICC has announced the prize money distribution for the recently concluded Men’s #T20WorldCup 2026.https://t.co/DyKnLpOm6p
— ICC (@ICC) March 11, 2026
बक्षीस रकमेचे वितरण (रुपयांमध्ये):
- भारत: २७.४८ कोटी
- न्यूझीलंड: १४.६५ कोटी
- दक्षिण आफ्रिका: ९.२५ कोटी
- इंग्लंड: ८.९६ कोटी
- वेस्ट इंडिज: ४.९५ कोटी
- पाकिस्तान: ४.८१ कोटी
- श्रीलंका: ४.३८ कोटी
- ऑस्ट्रेलिया/अफगाणिस्तान: २.८५ कोटी
भारताने आपल्या घरच्या मैदानावर जेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे, ज्यामुळे या विजयाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.





