Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Supriya Sule : दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान एक अनपेक्षित घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीकडे रवाना होत असताना त्यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ विमानतळावर त्यांना थांबावा लागलं होतं. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं.
या विमानात सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. संबंधित विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर ते तातडीने तपासणीसाठी थांबवण्यात आले. सुमारे दोन तासांच्या दुरुस्तीनंतर संध्याकाळी 7 वाजता विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतले.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Supriya Sule)
हेही वाचा : Realme P4R5G: 8000mAh बॅटरीसह Realme P4R 5G लॉन्च; एकदा चार्ज केल्यावर 3 दिवसांची साथ!
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? (Supriya Sule)
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला या घटनेची माहिती नव्हती. पत्रकारांकडूनच मला याबद्दल समजले. पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांची काळजी वाटली. विमानात तांत्रिक बिघाड झाला असेल, तर तो निश्चितच गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.”

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
त्या पुढे म्हणाल्या, “विमान, रेल्वे किंवा कोणतेही प्रवासी वाहन असो, सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रवासादरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होणे हे गंभीरतेने घेण्यासारखे आहे. संबंधित कंपनीबाबत विविध चर्चा होत असतात, मात्र या घटनेबाबतची संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही.” (Supriya Sule)
खासगी विमानांच्या वापराबाबत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्चात काटकसर करण्याबाबत केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. “प्रवास खर्च कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्वांना केले आहे. आम्हीही त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत आहोत. हा विषय केवळ एका प्रवासापुरता मर्यादित नसून वाढत्या खर्च, इंधन दर आणि आर्थिक परिस्थितीशीही संबंधित आहे,” असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा : Strait-Of-Hormuz : होर्मुझची नाकेबंदी भारतासाठी धोक्याची घंटा ; पेट्रोल-डिझेलसह ‘या’ चार गोष्टी महागणार





