Team India Penalty : विप्राज निगमच्या ‘त्या’ दोन चुकांमुळे पंचांनी टीम इंडियाला सुनावली मोठी शिक्षा! न खेळता श्रीलंकेला मिळाल्या १० धावा
Team India Penalty : भारतीय संघाचा नवोदित खेळाडू विप्राज निगम याच्या एका गंभीर चुकीमुळे पंचानी टीम इंडियावर थेट १० धावांचा दंड ठोठावला.

Team India 10 Runs Penalty because Vipraj Nigam : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी ‘अ’ एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारत आणि श्रीलंका ‘अ’ संघातील सामन्यादरम्यान एक अत्यंत अजब आणि धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. भारतीय संघाचा नवोदित खेळाडू विप्राज निगम याच्या एका गंभीर चुकीमुळे पंचानी टीम इंडियावर थेट १० धावांचा दंड ठोठावला. या दंडात्मक कारवाईमुळे श्रीलंका संघाला एकाही चेंडूचा सामना न करता मोफत १० धावा मिळाल्या, म्हणजेच श्रीलंकेचा डाव ‘०’ वरून नाही तर थेट ‘१० धावांवरून’ सुरू झाला. (Team India Penalty)
विप्राज निगमने खेळपट्टीवर केली ‘ही’ चूक! (Team India Penalty)
क्रिकेटच्या नियमांनुसार, खेळपट्टीचा मधला भाग हा ‘डेंजर एरिया’ मानला जातो, जिथे धावण्यास फलंदाजांना सक्त मनाई असते. कारण तिथे धावल्याने खेळपट्टी खराब होऊन गोलंदाजांना त्याचा फायदा मिळू शकत नाही. विप्राज निगमने फलंदाजी करताना याच नियमाचे दोनदा उल्लंघन केले. ज्यामुळे पंचांनी टीम इंडियाला १० धावांचा दंड ठोठावला.
🚨 Crazy scenes in India A vs Sri Lanka A!
Sri Lanka started their chase at 10/0 without facing a ball 😳
Reason: Vipraj Nigam was penalized twice for running on the pitch’s danger area, gifting 10 runs.
India also got 5 penalty runs earlier after the ball hit Sri Lanka’s… pic.twitter.com/TGE4qTwVz0
— Kunal Bhanwala (@bhanwala_k38130) June 15, 2026
पहिल्यांदा ३५ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विप्राज खेळपट्टीच्या मधोमध धावला, तेव्हा पंचांनी त्याला पहिली गंभीर ताकीददिली होती. मात्र, त्यानंतरही ३७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने पुन्हा तीच चूक केली आणि तो ‘डेंजर झोन’मध्ये धावला. विप्राजने दुसऱ्यांदा चूक करताच पंचांनी भारतीय संघावर १० धावांची मोठी पेनल्टी लावली.
सूर्यांश शेड्गे आणि विप्राज निगमची शतकी भागीदारी – (Team India Penalty)
🚨 ZERO GAME AWARENESS BY VIPRAJ NIGAM AGAINST SRILANKA A 🚨
India-A have been penalised 10 runs.🤯
Vipraj Nigam keeps running down the danger zone, and it means that Sri Lanka will start at 10/0 when they come out to bat. pic.twitter.com/it78TLhSra
— Cricket Central (@CricketCentrl) June 15, 2026
विप्राजकडून ही मोठी चूक झाली असली, तरी त्यानेच संकटसमयी सूर्यांश शेड्गे याच्यासोबत मिळून भारताचा डाव सावरला. सामन्यात भारताच्या टॉप ऑर्डरने शरणागती पत्करली होती आणि एकवेळ भारताची अवस्था ७ बाद १४३ अशी बिकट झाली होती. येथून विप्राज आणि सूर्यांश या जोडीने ८ व्या विकेटसाठी १०४ धावांची झुंजार भागीदारी करत भारताला २६५ धावांपर्यंत पोहोचवले. (Team India Penalty)
सूर्यांश शेड्गेने ६६ चेंडूंत ७२ धावांची (२ षटकार, ३ चौकार) तर विप्राज निगमने ४९ चेंडूंत ५१ धावांची (६ चौकार) अर्धशतकी खेळी केली. श्रीलंकेकडून मोहम्मद शिराज आणि विजयकांत व्यासकांत यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. (Team India Penalty)





