Kane Williamson Retirement : जागतिक क्रिकेटमधील एका सुवर्ण युगाचा अंत! स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला राम-राम
Kane Williamson Retirement : तो यापूर्वीच मर्यादित षटकांच्या (वनडे आणि टी-२०) क्रिकेटपासून दूर झाला होता, परंतु आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हणत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे.

Kane Williamson Announces Retirement From International Cricket : जागतिक क्रिकेटमधील सर्वात सभ्य आणि ‘फॅब-फोर’ पैकी एक मानल्या जाणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने (Kane Williamson ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर विल्यमसनने हा धक्कादायक निर्णय घेतला. तो यापूर्वीच मर्यादित षटकांच्या (वनडे आणि टी-२०) क्रिकेटपासून दूर झाला होता, परंतु आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हणत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. १६ वर्षांच्या या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कारकिर्दीत तो न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला.
“आता योग्य वेळ आली आहे…” भावूक विल्यमसनचे वक्तव्य! (Kane Williamson Retirement)
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना केन विल्यमसन भावूक झाला. तो म्हणाला, “मी गेल्या अनेक दिवसांपासून यावर विचार करत होतो आणि अखेर आता थांबण्याची योग्य वेळ आली आहे, हे स्पष्ट झाले. देशासाठी खेळताना मी नेहमीच माझे १०० टक्के योगदान दिले. स्वतःच्या अटींवर आणि सन्मानाने निवृत्ती घेता आली, याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. किवी संघाचे भविष्य उज्ज्वल असून या संघाचा इतका काळ हिस्सा राहणे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.”
४८ शतके अन् वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद – (Kane Williamson Retirement)
🚨 EMOTIONAL STATMENT BY KANE WILLIAMSON ON HIS RETIREMENT FROM INTERNATIONAL CRICKET🚨
Kane Williamson Said,🗣️
“It’s been special and I’ve loved every moment of it.This team is very close to my heart and has been a massive part of my life. Team sport is a special thin, the… pic.twitter.com/D949qpRUAl
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) June 12, 2026
केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक १९,३४६ धावा कुटल्या असून यात ४८ शतकांचा समावेश आहे. त्याने कसोटीत ९,५१५ धावा, वनडेत ७,२५६ धावा आणि टी-२० मध्ये २५,७५ धावा केल्या आहेत. त्याच्याच कणखर नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताचा पराभव करून पहिल्यावहिल्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चे जेतेपद पटकावले होते. तसेच २०१९ च्या वनडे विश्वचषकात न्यूझीलंडला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याची भूमिका मोलाची होती, जिथे त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (Kane Williamson Retirement)
कप्तानीमध्येही राहिला शानदार रेकॉर्ड – (Kane Williamson Retirement)
“It’s a team I love and it’s so dear to my heart”
Thank you for the memories, Kane 🖤🤍 pic.twitter.com/u1qBOMEfzy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 12, 2026
विल्यमसनने ४० कसोटी सामन्यात कप्तानी करताना २२ सामने जिंकून दिले. तर ९१ वनडे सामन्यात ४६ विजय आणि ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३९ विजय मिळवून देत त्याने आपली सर्वोत्तम नेतृत्वक्षमता सिद्ध केली होती. त्याच्या निवृत्तीने न्यूझीलंड क्रिकेटमध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.





