Harmanpreet Kaur Record : हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजला मागे टाकत टी-२० विश्वचषकात ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच
Harmanpreet Kaur Record : या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानात उतरताच इतिहास रचला आहे.

Harmanpreet Kaur Breaks Mithali Raj Record : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली आहे. बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद १७० धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. तिने भारताची माजी दिग्गज कर्णधार मिताली राज हिला मागे टाकत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
हरमनप्रीतच्या नावावर आता ७६२ धावा –
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूंत ३६ धावांची संयमी खेळी केली. या खेळीसह तिने मिताली राजचा ७२६ धावांचा विक्रम मोडीत काढला. हरमनप्रीतने आतापर्यंत महिला टी-२० विश्वचषकात एकूण ४० सामन्यांच्या ३४ पार्यांमध्ये २५.४ च्या सरासरीने ७६२ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने १ शतक आणि ४ अर्धशतके झळकावली असून तिचा स्ट्राईक रेट १११.७३ चा आहे. या यादीत आता मिताली राज ७२६ धावांसह दुसऱ्या, तर स्मृती मंधाना ५९२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
🚨 MILESTONE 🚨
Captain Harmanpreet Kaur breaks Mithali Raj’s record for the most runs by an Indian in the Women’s T20 World Cup! 🇮🇳💙🌟#HarmanpreetKaur #SKC #INDW #Sportskeeda pic.twitter.com/XTQqtfdFog
— Sportskeeda (@Sportskeeda) June 14, 2026
स्मृती मानधनाने मितालीच्या विक्रमाशी केली बरोबरी –
𝐓𝐡𝐞 𝐫𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐧𝐨𝐰 𝐛𝐞𝐥𝐨𝐧𝐠𝐬 𝐭𝐨 𝐇𝐚𝐫𝐦𝐚𝐧𝐩𝐫𝐞𝐞𝐭 𝐊𝐚𝐮𝐫 🇮🇳
India’s leading run-scorer in Women’s T20 World Cup history 💪#CricketTwitter pic.twitter.com/zDKVjz5El4
— Female Cricket (@imfemalecricket) June 14, 2026
या सामन्यात भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ४४ चेंडूंत ६८ धावांची स्फोटक खेळी केली. या शानदार अर्धशतकासह मानधनाने विश्वचषकात पाचव्यांदा ‘फिफ्टी प्लस’ (५०+) धावा केल्या आहेत.
आता टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि मिताली राज या तिघीही ५-५ इनिंग्सह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आल्या आहेत. या चालू विश्वचषकात हरमनप्रीत आणि मानधना दोघींकडेही मितालीला या विक्रमात मागे टाकून अव्वल स्थान पटकावण्याची सुवर्णसंधी आहे.





