Team India ODI Schedule : IPL नंतर टीम इंडियाचं मिशन ‘वर्ल्ड कप २०२७’! ‘रो-को’च्या भवितव्याचा फैसला ‘या’ २० वनडे सामन्यांत होणार
Team India ODI Schedule : बीसीसीआयने टीम इंडियाच्या आगामी वनडे सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

BCCI announces Team India’s ODI matches schedule : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा निळ्या जर्सीत एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकाची तयारी म्हणून टीम इंडिया आतापासूनच रणनीती आखत आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, भारत पुढील वर्षभरात एकूण २० एकदिवसीय सामने खेळणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध होणार मालिकेचा श्रीगणेशा –
आयपीएल संपल्यानंतर जून महिन्यात अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ६ जूनपासून एक कसोटी सामना खेळवला जाईल, त्यानंतर १४ जूनपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होईल. ही मालिका २० जूनपर्यंत चालेल. रोहित आणि विराट या मालिकेपासून विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करतील.
विदेशी दौरे आणि घरगुती मालिकांचा तडका –
— BCCI (@BCCI) March 26, 2026
अफगाणिस्तान मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ३ वनडे सामने खेळले जातील. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येईल, जिथे ३ सामन्यांची मालिका रंगेल. विशेष म्हणजे, भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर तब्बल ५ वनडे सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येकी ३ सामन्यांच्या मालिका भारतातच पार पडतील.
रोहित-विराटच्या भवितव्याचा फैसला?
रोहित शर्मा आणि विराट कोहली आता प्रामुख्याने वनडे फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहेत. या २० सामन्यांमधील त्यांची कामगिरीच हे ठरवेल की २०२७ च्या विश्वचषकात ते भारतीय संघाचे नेतृत्व करतील की नाही. चाहत्यांच्या नजरा या दोन्ही ‘रनमशीन’वर खिळल्या आहेत, कारण विश्वचषकापूर्वी फॉर्मात राहणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे.
वर्ल्ड कप २०२७ पर्यंतचे टीम इंडियाचे वनडे वेळापत्रक:
- अफगाणिस्तान: ३ वनडे (भारत)
- इंग्लंड: ३ वनडे (इंग्लंड दौरा)
- वेस्ट इंडिज: ३ वनडे (भारत)
- न्यूझीलंड: ५ वनडे (न्यूझीलंड दौरा)
- श्रीलंका: ३ वनडे (भारत)
- झिम्बाब्वे: ३ वनडे (भारत)





