IPL 2026 Schedule : IPL 2026 च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक
IPL 2026 Schedule : बीसीसीआयने आयपीएल 2026चं उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

BCCI Announces IPL 2026 2nd phase schedule : आयपीएल २०२६ च्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक (२८ मार्च ते १२ एप्रिल) आधीच समोर आले होते. आता बीसीसीआयने दुसऱ्या टप्प्यातील १३ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या उर्वरित ५० लीग सामन्यांची घोषणा केली आहे. या टप्प्यात प्लेऑफची शर्यत अधिक तीव्र होणार असून, देशातील १२ वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आणि ‘डबल हेडर’चा तडका –
दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १३ एप्रिल रोजी हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. या टप्प्यात एकूण ८ ‘डबल हेडर’ (एका दिवशी दोन सामने) पाहायला मिळतील. दुपारचे सामने ३:३० वाजता, तर सायंकाळचे सामने ७:३० वाजता सुरू होतील.
यजमान शहरांची घोषणा –
🚨 News 🚨
BCCI announces schedule for second phase of #TATAIPL 2026 🗓️
The remainder of the league stage, comprising 50 matches, will be played from April 13 to May 24, 2026, across 12 venues in India 🏟️
More details 🔽https://t.co/iYGnB0Gd2J
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2026
बीसीसीआयने या टप्प्यासाठी मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड या शहरांची निवड केली आहे.
- पंजाब किंग्स: आपले घरगुती सामने न्यू चंदीगड आणि धरमशाला येथे खेळणार आहे (धरमशालामध्ये ३ सामने होतील).
- राजस्थान रॉयल्स: जयपूरमध्ये ४ घरगुती सामने खेळणार आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: बंगळुरूमध्ये ३ आणि रायपूरमध्ये २ घरगुती सामने खेळणार आहे.
प्लेऑफचे ठिकाण अद्याप गुलदस्त्यात –
लीग स्टेजमधील सर्व ७० सामन्यांचे वेळापत्रक आता स्पष्ट झाले असले तरी, बीसीसीआयने प्लेऑफ आणि अंतिम सामन्याच्या ठिकाणांची घोषणा अद्याप केलेली नाही. लीग स्टेज जसा अंतिम टप्प्यात पोहोचेल, तसे प्लेऑफचे वेन्यू जाहीर केले जातील. गुणतालिकेत अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता सर्व १० संघांमध्ये ‘करो या मरो’ची लढाई पाहायला मिळणार आहे.





