Kamlesh Jain Resigns : मोठी बातमी! भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील मुख्य चेहरा नोटिस पीरियडवर; नेमकं कारण काय?
Kamlesh Jain Resigns : कमलेश जैन यांच्या राजीनाम्यामुळे ड्रेसिंग रूममधील सपोर्ट स्टाफमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Team India Physio Kamlesh Jain Resigns Ahead Of Afghanistan T20 Series Support Staff Exit : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे मुख्य फिजिओ कमलेश जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी भारतीय संघाची साथ सोडली होती. त्यानंतर आता कमलेश जैन यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे ड्रेसिंग रूममधील सपोर्ट स्टाफमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तीन महिन्यांच्या नोटीस पीरियडवर; बीसीसीआयकडून अद्याप निर्णय बाकी-
क्रिकबझच्या वृत्तानुसार, कमलेश जैन सध्या दिल्लीत असून तेथेच अफगाणिस्तानविरुद्धचे तिन्ही सामने खेळवले जाणार आहेत. त्यांनी बीसीसीआयकडे राजीनामा सुपूर्द केला असला, तरी क्रिकेट बोर्डाने तो अद्याप अधिकृतपणे स्वीकारलेला नाही. जैन सध्या तीन महिन्यांचा नोटीस पीरियड पूर्ण करत आहेत. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंत ते संघासोबत कायम राहणार की त्याआधीच बीसीसीआय त्यांना जबाबदारीतून मुक्त करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
India men’s team physio Kamlesh Jain has submitted his resignation. Jain, who joined the Indian team in June 2022, is currently serving his three-month notice period and is awaiting to be relieved by the board.
The series in New Zealand, which ends in early December, could be… pic.twitter.com/xBHZkxnPRr
— Cricbuzz (@cricbuzz) September 10, 2026
खेळाडूंच्या सातत्यपूर्ण दुखापती भोवल्या? साडेचार वर्षांनंतर पदाला रामराम-
Team India’s support staff set for a change. 🇮🇳
Physio Kamlesh Jain has submitted his resignation after more than four years with the Indian team. His ongoing notice period could see the upcoming New Zealand series become his final assignment with India. 🏏#TeamIndia pic.twitter.com/OtPdLYSooj
— SportsTiger (@The_SportsTiger) September 11, 2026
नितीन पटेल यांच्यानंतर चेन्नईचे कमलेश जैन टीम इंडियाचे मुख्य फिजिओ बनले होते; तसेच त्यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठीही काम केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापन त्यांच्या कामगिरीवर फारसे समाधानी नव्हते. दुसरीकडे, कौटुंबिक कारणांमुळे साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वतः जैन यांनीच ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.
हर्षित राणासह अनेक खेळाडू जायबंदी; दुखापतींचे सत्र संपेना!
भारतीय संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा पेच दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वॉशिंग्टन सुंदर तंदुरुस्त होऊन परतला असला, तरी हर्षित राणा दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर पडला आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या वारंवार उद्भवणाऱ्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. अशा नाजूक वळणावर मुख्य फिजिओनेच पद सोडल्याने सपोर्ट स्टाफमधील रिक्त जागा भरण्याचे मोठे आव्हान बीसीसीआयसमोर उभे ठाकले आहे.





