Team India : २०२३ चा ‘शाप’ टाळण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लॅन! हॉटेल ते ड्रेसिंग रूममध्ये मोठे बदल; अंधश्रद्धा की रणनीती?
Team India : मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ च्या फायनलवेळी भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, ते हॉटेल यावेळी जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे.

Team India Ahmedabad Hotel Change : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्च रोजी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असणार आहे. या मैदानावर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची कटू आठवण पुसून काढण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नकारात्मक ‘जिंक्स’ (Jinx) टाळण्यासाठी संघाने निवास व्यवस्था आणि ड्रेसिंग रूममध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉटेल बदलले, ड्रेसिंग रूमही वेगळी! Team India
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ च्या फायनलवेळी भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, ते हॉटेल यावेळी जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. त्यावेळी संघ ‘आयटीसी नर्मदा’ (ITC Narmada) हॉटेलमध्ये होता. यावेळी संघाने ‘ताज स्कायलाईन’ (Taj Skyline) हॉटेलची निवड केल्याचे समजते.
तसेच, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आपला हक्काचा ‘होम ड्रेसिंग रूम’ न वापरता ‘व्हिजिटिंग टीम’च्या ड्रेसिंग रूमचा वापर करण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये होम ड्रेसिंग रूममधून मैदानात उतरलेल्या भारताचा पराभव झाला होता, त्यामुळे हा ‘बदला’ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी असल्याचे मानले जात आहे.
— BCCI (@BCCI) March 6, 2026
काय सांगतो आयसीसी प्रोटोकॉल? Team India
आयसीसीच्या नियमांनुसार, फायनलमध्ये जो संघ आधी पोहोचतो (भारत), त्याला सामान्यतः ‘आयटीसी नर्मदा’मध्ये ठेवले जाते. मात्र, जुन्या आठवणी टाळण्यासाठी भारताने हॉटेल निवडीत बदल केल्याचे बोलले जात आहे. ड्रेसिंग रूम बदलण्याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आले नसले तरी, चाहत्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा टी-२० रेकॉर्ड: Team India
अहमदाबादचे हे मैदान भारतासाठी संमिश्र यश देणारे ठरले आहे:
- एकूण सामने: १०
- विजय: ७
- पराभव: ३
या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचे तर भारताने या मैदानावर नेदरलँड्सला १७ धावांनी हरवले, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, या संपूर्ण विश्वचषकात भारताचा हा एकमेव पराभव आहे.





