Prize Money : टी-२० विश्वचषक फायनल जिंकणाऱ्या संघाला मिळणार ‘इतके’ कोटी! उपविजेत्याचीही होणार चांदी; ICCने उघडला खजिना
Prize Money : या स्पर्धेसाठी आयसीसीने एकूण १३.५ मिलियन डॉलर्स (सुमारे १२३.७७ कोटी रुपये) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम २०२४ च्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे.

Prize Money for T20 World Cup 2026 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याने संपूर्ण क्रिकेट विश्व व्यापले आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे, तर न्यूझीलंड आपला पहिला टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने एकूण १३.५ मिलियन डॉलर्स (सुमारे १२३.७७ कोटी रुपये) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम २०२४ च्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे.
विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती मिळणार? Prize Money
या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन ठरेल, त्याला ३ मिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे २७.५० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. दुसरीकडे, अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजेच १४.६७ कोटी रुपये दिले जातील.
रिकाम्या हाती कोणीच जाणार नाही! Prize Money
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व २० संघांना काही ना काही रक्कम मिळणार आहे:
- सेमीफायनलमध्ये पराभूत झालेले संघ: प्रत्येकी ७.२४ कोटी रुपये ($०.७९ मिलियन)
- ५ ते १२ व्या क्रमांकावरील संघ: प्रत्येकी ३.४८ कोटी रुपये ($०.३८ मिलियन)
- १३ ते २० व्या क्रमांकावरील संघ: प्रत्येकी २.२९ कोटी रुपये ($०.२५ मिलियन)
२०२४ च्या तुलनेत मोठी वाढ – Prize Money
🎤 The stage keeps getting bigger!
Joining Global Superstar Ricky Martin at the Closing Ceremony before the #T20WorldCup Final are music icons Sukhbir and Falguni Pathak!Get ready for global hits and desi anthems as these legendary artists light up the biggest night in cricket.… pic.twitter.com/8kMK7yg31b
— ICC (@ICC) March 7, 2026
२०२४ च्या टी-२० विश्वचषकात एकूण बक्षीस रक्कम ११.२५ मिलियन डॉलर्स होती. त्यावेळी विजेता ठरलेल्या भारतीय संघाला २.४५ मिलियन डॉलर्स मिळाले होते. यावेळच्या विजेत्याला त्यापेक्षा जास्त म्हणजे ३ मिलियन डॉलर्स मिळणार आहेत, ज्यामुळे खेळाडूंचा उत्साह आणखी वाढला आहे.





