Glenn Phillips Statement : ‘तो पण माणूसच आहे, त्याचा पण वाईट दिवस येईल’, फायनलपूर्वी ग्लेन फिलिप्सचं बुमराहबद्दल मोठं वक्तव्य
Glenn Phillips Statement : अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्स याने बुमराहच्या कामगिरीवर आणि त्याच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.

Glenn Phillips Statement on Jasprit Bumrah : गुरुवारी वानखेडेवर इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत भारताने फायनलमध्ये धडक मारली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या जसप्रीत बुमराहची भीती आता प्रतिस्पर्धी संघाला सतावू लागली आहे. उद्या, ८ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्स याने बुमराहच्या कामगिरीवर आणि त्याच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.
काय म्हणाला ग्लेन फिलिप्स? (Glenn Phillips Statement)

Glenn Phillips
जसप्रीत बुमराहने या संपूर्ण विश्वचषकात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना आपल्या अचूक माऱ्याने जेरीस आणले आहे. मात्र, फिलिप्सच्या मते बुमराह अजिंक्य नाही. तो म्हणाला, “बुमराह हा नक्कीच एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, यात शंका नाही. त्याच्याकडे खूप ‘व्हरायटी’ आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये तो घातक ठरतो. पण तोदेखील एक माणूसच आहे, आपल्यासारखाच त्याचाही एखादा दिवस वाईट असू शकतो.”
बुमराहच्या चुकीची वाट पाहणार किवी संघ – (Glenn Phillips Statement)
फिलिप्सने पुढे नमूद केले की, “चूक करणे हा मानवी स्वभाव आहे आणि बुमराहकडूनही चुका होऊ शकतात. आम्ही रविवारी याच आशेने मैदानात उतरू की त्याचा दिवस वाईट असेल आणि आमचा दिवस चांगला जाईल. इंग्लंडने सेमीफायनलमध्ये ज्या प्रकारे शेवटच्या षटकांत त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, तीच रणनीती आम्हीही वापरू शकतो. बुमराह जी संधी देईल, त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा उठवावा लागेल.”
द्विपक्षीय मालिकेतील यशाचा आत्मविश्वास –
विश्वचषकापूर्वी झालेल्या मालिकेत फिलिप्सला बुमराहविरुद्ध काही प्रमाणात यश मिळाले होते. तोच आत्मविश्वास घेऊन तो फायनलमध्ये उतरणार आहे. बुमराहच्या अचूक यॉर्कर आणि स्लोअर बॉल्सचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडने विशेष रणनीती आखल्याचे या विधानावरून स्पष्ट होत आहे. Glenn Phillips Statement





