Tamil Nadu Elections : तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची घोषणा सुरू असताना काढलेले एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या फोटोमध्ये टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपती विजय हे पक्षाचे तिकीट मिळाल्यावर आनंदाआश्रू अनावर झालेल्या के. विजय धामू या रिक्षाचालकाला प्रेमाने मिठी मारताना दिसले होते. (Tamil Nadu Elections) त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान विजय थलापती आणि के. विजय धामू या रिक्षाचालकाचा फोटो प्रचंड चर्चेत आला होता. तामिळनाडूमधील लोकांना खात्री पटली की, विजय थलपती आपल्या पक्षात खरोखरच सामान्य नागरिकांना सक्षम करत आहेत आणि या विश्वासाचा परिणाम निवडणूक निकालातून दिसत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्ष सर्वात आघाडीवर असून विजय धामू या रिक्षाचालकाने सत्तेच्या शिखरावर बसलेल्या एका दिग्गजाला धूळ चारली आहे. (Tamil Nadu Elections) व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या के. विजय धामू यांचा तामिळनाडूतील रोयापुरम विधानसभा मतदारसंघातून झालेला विजय हा केवळ सर्वांनाच चकित करणारा ठरला नाही, तर त्याने लोकशाहीमध्ये लोकांची ताकद ही कोणत्याही प्रकारच्या प्रभावापेक्षा किंवा संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असते, हेही निर्णायकपणे सिद्ध केले आहे. के. विजय धामू यांनी एकाच वेळी राज्यातील दोन सर्वात बलाढ्य राजकीय घराण्यांचा पराभव केला आहेके. विजय धामू यांनी 55,000 हून अधिक मते मिळवली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 14,000 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत एक ऐतिहासिक विजय नोंदवला. (Tamil Nadu Elections)