Thalapathy Vijay | Tamilnadu Election 2026 – विजय यांच्या TVK मुळे राजकारणात खळबळ देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान अनेक ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः Tamil Nadu मध्ये यंदाची निवडणूक पारंपरिक राजकीय समीकरणांपेक्षा वेगळी ठरताना दिसत आहे. Thalapathy Vijay अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय यांच्या TVK पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक मैदानात उतरून मोठी छाप पाडल्याची चर्चा आहे. सुरुवातीच्या कलांनुसार काही मतदारसंघांमध्ये TVK ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत आहेत. मात्र, “१०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी” किंवा “सत्ता निश्चित” अशा दाव्यांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. राज्यातील पारंपरिक बलाढ्य पक्ष DMK आणिAIADMKयांच्या बरोबरीने TVK हा एक नवीन पर्याय म्हणून पुढे येत असल्याने राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Thalapathy Vijay Thalapathy Vijay दरम्यान, अश्यातच भाजप कडूनही तामिळनाडूत राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. काही माध्यमांमध्ये भाजप नेत्यांनी TVK सोबत संभाव्य सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याचे म्हटले जाते. Thalapathy Vijay तामिळनाडूतील भाजपच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीत विजय यांच्याबद्दल आदर व्यक्त करत “दरवाजे खुले आहेत” असे संकेत दिल्याचे वृत्त आहे. यावेळी खुशबू यांनी वियज यांचा “तांबी” (धाकटा भाऊ) असा उल्लेख करत स्वतःला “अक्का” (थोरली बहीण) असे म्हटले आहे. तसेच युतीच्या शक्यतेबाबत त्यांना विचारले असता याचा निर्णय भावालाच घ्यावा लागेल. अक्का म्हणून, माझ्या मनात विजयबद्दल अत्यंत आदर आणि स्नेह आहे. माझ्या धाकट्या भावाला माझ्या सदैव शुभेच्छा, मात्र निष्ठा ही माझ्या पक्षाशीच आहे, असेही खुशबू यांनी म्हटलं आहे. एकूणच, तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाच्या एन्ट्रीमुळे राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीचे कल आशादायक असले तरी अंतिम निकाल आणि संभाव्य युती यावरच पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही तास आणि दिवस तामिळनाडूच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. ही ठरली विजय यांची बलस्थाने : (Thalapathy Vijay) तरुणांकडून भक्कम पाठिंबा फॅन क्लबवर आधारित मतदारवर्ग शहरी कामगार वर्गामध्ये लोकप्रियता पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचा पाठिंबा सत्ताविरोधी लाट सोशल मीडियावरील प्रभाव ग्रामीण भागात मर्यादित पोहोच; मात्र शहरी मध्यमवर्गामध्ये पिछाडी भरून काढली विजय यांची आश्वासने : महिलांसाठी २,५०० रूपये मासिक मदत विवाह सहाय्यासाठी ८ ग्रॅम सोने स्वयं-सहायता गटांसाठी ५ लाख रूपये बिनव्याजी कर्ज शिक्षण सुरू ठेवण्यासाठी १५,००० रूपये वार्षिक मदत एआय युनिव्हर्सिटी आणि एआय सिटी लघु शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची संपूर्ण माफी किमान आधारभूत किंमत : धानासाठी रूपये ३,५००, उसासाठी रूपये ४,५०० ५ लाख सरकारी नोकऱ्या ५ लाख इंटर्नशिप ४,००० रूपये बेरोजगारी भत्ता