राज्यस्तरिय कृषिविभागाच्या विविध स्पर्धामध्ये पुणे विभागाचा अव्वल क्रमांक

राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत राज्य कृषिविभागाच्या स्पर्धा संपन्न.

कोपरगाव प्रतिनिधी – कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चैथ्या वार्षिक तिन दिवसीय कृषि राज्य स्तरिय तरंग कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथिल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजीत करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये राज्याच्या 34 जिल्ह्यातील 3 हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 297 महिला खेळाडूंचा सहभाग होता वैयक्तिक व सांघिक अशा खेळांच्या प्रकारा बरोबर सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पुणे कृषि विभागाच्या कर्मचारी अधिकारी खेळाडूंनी 100 पैकी 81 गुण मिळवून राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 55 गुण मिळवून सोलापूर कृषि विभागाने व्दीतीय 54 गुण मिळवून अहमदनगर विभागाने तृतिय क्रमांक 43 गुण मिळवून पालघर विभागाने चतूर्थ, 41 गुण मिळवून अमरावतीने पाचवा, 36 गुण मिळवून ठाणे विभागाने सहावा, तर 35 गुण मिळवून रायगड विभागाने सातवा क्रमांक मिळवला आहे.

विभाग निहाय यशवंत व गुणवंत खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला. कृषि संचालक विजय घावट,े विभागीय कृषि सहसंचालक दिलीप झेंडे, श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक राहूल मदने, सदिंप खोते, रफिक नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी दिलीप झेंडे म्हणाले कृषि विभागाचे कर्मचारी यांच्यामध्ये या क्रीडा स्पर्धामूळे खिलाडू वृत्ती निर्माण झाली. कृषि विभागाच्या कामकाजात त्यांच्या हातून कृषि विभागाची व या राज्याच्या शेतकÚयांची विषेश सेवा घडावी. आत्मा मालिक गुरूदेव माऊलींच्या सानिध्यात अतिशय पवित्र प्रांगनात या स्पर्धा संपन्न झाल्या त्यामुळे सर्वांचे मनोधैर्य वाढले आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी रफिक नाईकवाडी म्हणाले आत्मा मालिक ध्यानपिठ, शैक्षणिक व क्रीडा संकुलाने राज्यातील कृषि विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व आधूनिक सुविधा पुरविल्यामूळे या स्पर्धा यशस्वीरीत्या पारपडू शकल्या. राज्यातील 3 हजार कर्मचारी अधिकारी खेळाडूंची निवासासह भोजनाची योग्य व्यवस्था करून सांस्कृतीक स्पर्धेसाठी लागणाÚया साहित्यासह अनेक तांत्रिक व्यवस्था करून दिल्याने खेळाडूंना दिलासा मिळाला.

आत्मा मालिक संकुलाच्या वतिने तब्बल 150 क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर क्रीडा स्पर्धेसाठी 37 प्रकारचे क्रीडा मैदान सज्ज होते. या भव्य स्पर्धांसाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली. या भव्य स्पर्धा आत्मा मालिकच्या प्रागंनात सुरू असल्याचे पाहून मंत्री भुसे म्हणाले की आत्मा मालिकने राज्य कर्मचाÚयांच्या स्पर्धांसाठी दिलेले योगदान अनमोल आहे. यापूढे राज्य स्तरीय होणाÚया स्पर्धांसाठी लागणारा खर्च राज्याच्या कृषि विभागाकडून पूर्ण दिला जाईल असे म्हणत तात्पूत्या स्वरूपाची मदत म्हणून नामदार भुसे यांनी 50 हजार रूपये स्पर्धसाठी मदत केली. दरम्यान या क्रीडा स्पर्धेच्या पारितोशीक वितरण समारंभाच्या वेळी, अहमदनगर जिल्हा कृषि अधिक्षक शिवाजी जगताप, नवनाथ कोळतकर, विलास नवगे, अशोक आढाव, मनोज सोनवणे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सुधाकर मलिक, नितीन सोनवणे क्रीडा विभागाचे अशोक कांगणे, अजित पवार, शेसेंद्र त्रिपाटी, रविंद्र नेंद्रे, भुषण पाटिल, पद्मराज गायके, योगेश निळे, प्रदिप निपुंगे आदिंची उपस्थिती होती.

सांस्कृतिक स्पर्धेसाठी ओम गुरूदेव माऊलींसह संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज यांच्यासह सर्व संत मांदिआळी समवेत अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, वसंतराव आव्हाड, व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदिंची उपस्थिती होती.
3 दिवशीय सांस्कृतिक व क्रीडा (पुरूष) स्पर्धेत कब्बडीमध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर, व्दितीय अकोला, तृतिय सातारा, (महिला) प्रथम पुणे, व्दितीय अहमदनगर, तृतिय सोलापूर. खो-खो – (पुरूष) प्रथम सोलापूर, व्दितीय सातारा, तृतिय कोल्हापूर, (महिला) – प्रथम पालघर, व्दितीय पुणे, तृृतिय औरंगाबाद, (पुरूष) – व्हाॅलिबाॅल प्रथम सोलापूर, व्दितीय नाशिक, तृतिय पुणे. (पुरूष) – क्रिकेट प्रथम पुणे, व्दितीय सातारा तृतिय लातूर, (महिला) – प्रथम पालघर, व्दितीय ठाणे, तृतिय कोल्हापूर. सांघीक खेळाबरोबर वयक्तिक खेळात पुणे विभागाने बाजी मारली आहे. विजेत्या संघाचे वयक्तिक खेळातील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्ती प्रत्रक व सुवर्ण, कांस्य, पदके देवून सन्मानीत करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.