TalegaonDabhade Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! भरधाव टेम्पोच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
Talegaon Dabhade Accident : तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकाजवळ भरधाव टेम्पोने पादचाऱ्याला उडवले; गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू.
Updated On:

Talegaon Dabhade Accident – भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्याने अनोळखी पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकाजवळ घडली. अब्दुल कादीर सरदार पटेल (वय ५८, रा. दुर्गा सेवासंघ प्लॉट नं. ८, झोपडपट्टी, लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णा पंढरी बावळे (वय ३१) यांनी गुरुवारी (दि. २६) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच ०४ ईबी ३३६४) निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून रस्ता ओलांडणाऱ्या अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीस धडक दिली. त्यात गंभीर दुखापत होऊन संबंधिताचा मृत्यू झाला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.





