Pune Crime : कसबा पेठेत बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ
Pune Crime : पुण्यातील कसबा पेठेतील पवळे चौकात अज्ञात व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळला. पोलिसांकडून ओळख आणि मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे.
Updated On:

Pune Crime : पुण्यातील कसबा पेठेतील पवळे चौकात एका अज्ञात व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
नेहमी वर्दळ असलेल्या भरवस्तीत मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.





