Talegaon Dabhade : भारतीय जनता पक्षाच्या विजयोत्सवानिमित्त शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रस्त्यावर फटाके फोडण्यात आले. फटाक्यांमुळे रस्त्यावर झालेला कचरा नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सहकाऱ्यांसह स्वतः झाडू हातात घेऊन साफ केला. प्रदुषणमुक्त तळेगाव शहरासाठी त्यांनी केलेल्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. विविध राज्यांतील निवडणुका तसेच राहुरी येथील पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहर भाजपच्या वतीने मारुती मंदिर चौकातील पक्ष कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच पेढे आणि लाडूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, गटनेते इंदरकुमार ओसवाल, नगरसेवक दीपक भेगडे, माजी नगरसेवक अरुण भेगडे पाटील, सचिन टकले, श्रीराम कुबेर, प्रकाश ओसवाल, माजी शहराध्यक्ष रवींद्र माने, लक्ष्मण माने, नितीन पोटे, हिम्मत पुरोहित यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Talegaon Dabhade Biocon : बायोकॉनच्या वारसदार ठरल्या! किरण मजूमदार-शॉ यांची पुतणी क्लेअर मजूमदार सांभाळणार ६० हजार कोटींच्या साम्राज्याची धुरा