T20 WorldCup – पाकिस्तान संघाला स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अगोदर भारताने आणि आता तर चक्क झिम्बाब्वेनेही पाकिस्तानला पराभवच जोरदार दणका दिला आहे. सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचे आता या स्पर्धेतील ( T20 WorldCup ) आव्हान जवळजवळ संपुष्टात आल्यातच जमा आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वेने दिलेल्या १३१ धावांचाही पाकिस्तान संघाला पाठलाग करता आला नाही आणि संघाला १ धावेने पराभव पत्करावा लागला.
#T20WorldCup : आणखी एक उलटफेर, झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर थरारक विजय
दरम्यान, या सामन्यावेळी देशाचा झेंडा घेऊन सेलिब्रेशन करणाऱ्या एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये तो चाहता त्यांच्या देशाचा (पाकिस्तान) झेंडा हा उलट्या पद्धतीने धरून फिरवत आहे. त्यानंतर त्याला मागच्या बाजूने काही जण सांगतात की, अरे तू झेंडा चुकीचा पकडलाय, तो बरोबर कर. यांनतर तो चाहता झेंडा योग्य पद्धतीने पकडतो. ( T20 WorldCup )
झिम्बाब्वेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण शाहीन आफ्रिदीला केवळ एक धाव करता आली आणि पाकिस्तानच्या संघाने सामना गमावला. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील ( T20 WorldCup ) हा पाचवा उलटफेर आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून केवळ 129 धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला.
इंडा सीधा पकड़ नहीं पाते, T20 World Cup में ज़िम्बाब्वे से हार जाते हैं..
और इन पाकिस्तानियों की चाहिए कश्मीर 😂 pic.twitter.com/Y9Vrz4bDPy
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) October 27, 2022