Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर भोंदूबाबा अशोक खरातचे ‘ते’ 8 व्हिडिओ व्हायरल

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Video) संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर आता सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे.

Updated On:
Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर भोंदूबाबा अशोक खरातचे ‘ते’ 8 व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Video) संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर आता सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे.

खरातने (Ashok Kharat Video)दैवी शक्ती असल्याचा बनाव करत शेकडो महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

नाशिक सातपूर पोलिसात 6 जणांवर गुन्हा

नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ६ ॲडमिन्स आणि सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात प्रकरणातील ८ अश्लील व्हिडिओ या ग्रुपवर प्रसारित केल्याचा आरोप या जणांवर आहे.

Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

गुन्ह्यात नावे आलेल्या आरोपींमध्ये सिद्धार्थ रामोशे, रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे आणि साहिल सय्यद यांचा समावेश आहे. इतर ॲडमिन्सनीही हे व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव आणि बीडमध्ये आणखी ३ जणांवर गुन्हा

काही दिवसांपासून सोशल मीडियावर पीडित महिलांचेही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याप्रकरणी पहिला गुन्हा अहिल्यानगर (नगर) पोलिसांनी दाखल केला आहे. कोपरगावमधील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीडमधील संदीप गरजे या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९४(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.

सरकारचा कडक बडगा

अशोक खरात प्रकरणातील (Ashok Kharat Video) व्हिडिओ आणि पीडित महिलांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. व्हिडिओ व्हायरल करून जनतेच्या भावना भडकवणाऱ्या आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्यांवर शासनाची नजर असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

सध्या नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी या प्रकरणातील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत. पोलिस यंत्रणा या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करत असून, आरोपींच्या शोधात वेगाने काम करत आहेत.

या कारवाईमुळे सोशल मीडियावर अश्लील कंटेंट पसरवणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला असून, अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Purushottam Kadalag : शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक! नेमकं प्रकरण काय?

2026-04-14 11:36:18

Purushottam Kadalag : शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक! नेमकं प्रकरण काय?

Parvati Shinde : “जावई सुटला नाही तरी चालेल, पण....”; भोंदू खरातच्या सासूबाईंची प्रतिक्रिया समोर म्हणाल्या “आमच्या खानदानात..."

2026-04-14 10:58:40

Parvati Shinde : “जावई सुटला नाही तरी चालेल, पण....”; भोंदू खरातच्या सासूबाईंची प्रतिक्रिया समोर म्हणाल्या “आमच्या खानदानात..."

Anjali Damania : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे खरातला 18 कॅाल; दमानियांचा मोठा दावा, जुना व्हिडिओ केला शेअर

2026-04-14 08:31:35

Anjali Damania : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे खरातला 18 कॅाल; दमानियांचा मोठा दावा, जुना व्हिडिओ केला शेअर

Ashok Kharat News : शक्तीपीठाच्या परिसरात अशोक खरातची जागा; तपासादरम्यान नवे धक्कादायक खुलासे

2026-04-12 21:32:00

Ashok Kharat News : शक्तीपीठाच्या परिसरात अशोक खरातची जागा; तपासादरम्यान नवे धक्कादायक खुलासे

Maharashtra Politics : 'सत्तेतला मोठा पक्ष मित्रांची शिकार करणार'; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

2026-04-12 17:52:38

Maharashtra Politics : 'सत्तेतला मोठा पक्ष मित्रांची शिकार करणार'; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा