Karisma kapoor video : जास्त झूम करू नका.! ‘करिश्मा कपूर’ने पापाराझींना चांगलंच सुनावलं
करिश्मा कपूरचा रिॲलिटी शो "इंडियाज बेस्ट डान्सर" लवकरच सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. याशिवाय, करिश्मा शेवटची नेटफ्लिक्सच्या "मर्डर मुबारक" या चित्रपटात दिसली होती.

Karisma kapoor : इंटरनेटवर पापाराझी व्हिडिओंचा एक अनोखा ट्रेंड दिसून येत आहे. बॉलिवूड स्टार्स अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये, चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी आणि टीव्ही शोच्या प्रीमियरवेळी पापाराझींसाठी पोज देताना दिसतात. Karisma kapoor video
अलीकडेच, ९० च्या दशकातील स्टार अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma kapoor ) तिच्या नवीन टीव्ही रिॲलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या नवीन सीझनच्या लाँचसाठी आली होती, जिथे ती पापाराझींसाठी पोज देण्यासाठी उभी राहिली. Karisma kapoor video
यावेळी करिश्मासोबत जावेद जाफरी, कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईस हे देखील उपस्थित होते. शोच्या नवीन सीझनच्या पहिल्या एपिसोडचे चित्रीकरण होणार होते.
पण त्याआधी, सर्व परीक्षकांनी पापाराझींची भेट घेतली. फोटो आणि व्हिडिओ सेशननंतर, सर्वजण निघत असताना, करिश्माने पापाराझींना हळूच सांगितले, “जास्त झूम करू नका..”
करिश्मा कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इंस्टाग्राम आणि रेडिटवरील युझर्सनी पुन्हा एकदा पापाराझी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका युझरने पापाराझींच्या व्हिडिओ आणि फोटो काढण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. Karisma kapoor video
View this post on Instagram
दुसऱ्या एकाने लिहिले की, करिश्माला हे सर्व तरुणांसमोर सांगावे लागले. तथापि, अनेकांचा असाही विश्वास आहे की करिश्माने पापाराझींना तिच्या चेहऱ्यावर झूम न करण्यास सांगितले होते. Karisma kapoor video
चुकीच्या अँगलने व्हिडिओ शूट केल्याबद्दल एखाद्या अभिनेत्रीने पापाराझींना फटकारण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडेच, जान्हवी कपूरनेही एका पॉडकास्टमध्ये पापाराझी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘अनेक लोक शरीराच्या अवयवांवर चुकीच्या पद्धतीने झूम करून व्हिडिओ काढतात, जे खूप चुकीचे आहे’. असं ती म्हणाली होती.
जान्हवी व्यतिरिक्त, नोरा फतेही, मृणाल ठाकूर, मोना सिंग आणि महिका शर्मा यांनीही चुकीच्या अँगलने शूटिंग केल्याबद्दल पापाराझींना फटकारले आहे. (Karisma kapoor video)
करिश्मा कपूरचा रिॲलिटी शो “इंडियाज बेस्ट डान्सर” लवकरच सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. याशिवाय, करिश्मा शेवटची नेटफ्लिक्सच्या “मर्डर मुबारक” या चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून तिने चित्रपटांमध्ये काम केलेले नाही. तिचे चाहते तिच्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. Karisma kapoor video






