Kriti sanon: उदयपूरमध्ये बहिणीच्या संगीत सोहळ्यात कृतिने लावले ठुमके; नूपूर-स्टेबिनचा डान्सही चर्चेत

Kriti sanon : उदयपूरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननची बहिण नूपूर सेनन हिच्या लग्नाचे विधी सध्या मोठ्या थाटामाटात सुरू आहेत. लग्नाआधी पार पडलेल्या संगीत आणि हळदी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
संगीत समारंभातील एका व्हिडिओमध्ये कृति सेनन अत्यंत आनंदी आणि उत्साही मूडमध्ये दिसत आहे. बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा करताना कृतिने भोजपुरी गाणे ‘कमरिया…’वर जबरदस्त डान्स केला. या डान्समध्ये तिच्यासोबत अभिनेता वरुण शर्मा देखील ठुमके लावताना दिसतो. कृति आणि वरुण हे एकमेकांचे जवळचे मित्र असल्याने त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष भावली.
View this post on Instagram
दरम्यान, नूपूर सेनन आणि गायक स्टेबिन बेन यांचाही डान्स संगीत सोहळ्यात लक्षवेधी ठरला. दोघांनीही स्टेजवर एकत्र डान्स करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या आनंदी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
उदयपूरमध्ये पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक मित्रमंडळी उपस्थित राहणार असल्याची चर्चा असून, कृति सेननच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत खास ठरत आहे.





