Badshah : घटस्फोटानंतर ६ वर्षांनी केलं दुसरं लग्न.! गायक बादशाह पुन्हा चर्चेत; तो VIDEO अखेर आला समोर
लोकप्रिय रॅपर आणि गायक 'बादशाह' सध्या त्यांच्या कथित दुसऱ्या लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Badshah – लोकप्रिय रॅपर आणि गायक ‘बादशाह’ (Badshah) सध्या त्यांच्या कथित दुसऱ्या लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये बादशाह लग्नाचे विधी करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बादशाह एका तरुणीसोबत वरमाला घालताना दिसत असून, त्यांनी गुपचूप दुसरे लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या लग्नाबाबत बादशाह किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. Badshah
व्हायरल व्हिडिओनंतर बादशाहचे नाव पंजाबी अभिनेत्री इशा रिखी हिच्यासोबत जोडले जात आहे. सोशल मीडियावरील पोस्टनंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे.
इशा रिखीची आई पूनम रिखी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये दोघे पारंपरिक लग्न विधी करताना आणि एकमेकांना वरमाला घालताना दिसत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षावही होत आहे. Badshah

Badshah : घटस्फोटानंतर ६ वर्षांनी केलं दुसरं लग्न.! गायक बादशाह पुन्हा चर्चेत; तो VIDEO अखेर आला समोर
दरम्यान, या व्हिडिओचा नेमका संदर्भ, तो खाजगी समारंभ, शूटिंग किंवा जुना कार्यक्रम आहे का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
पहिल्या पत्नीपासून 2020 मध्ये विभक्त : Badshah
बादशाह यांचे पहिले लग्न जास्मिन मसीह यांच्याशी झाले होते. दोघे 2020 मध्ये परस्पर संमतीने वेगळे झाले. त्यांना एक मुलगीही आहे. विभक्त झाल्यानंतर बादशाहच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा होत राहिल्या.
View this post on Instagram
पूर्वीही रिलेशनशिपच्या चर्चा :
मागील काही वर्षांत बादशाहचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिच्यासोबत जोडले गेले होते. त्यानंतर इशा रिखीसोबत त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र या संबंधांबाबत त्यांनी सार्वजनिकरीत्या कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कोण आहे गायक बादशाह?
‘बादशाह’चे खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. त्यांचा जन्म दिल्ली मध्ये झाला असून, त्याने रॅप, पॉप आणि बॉलिवूड म्युझिक यामध्ये आपले नाव उंचावले आहे.
बादशाह यांनी भारतीय पॉप आणि बॉलिवूड संगीतामध्ये रॅप संस्कृती लोकप्रिय करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्या गाण्यांना यूट्यूब आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.





