T20 World Cup 2024 (IND vs USA) : टीम इंडिया पहिल्यांदाच आज अमेरिकेशी भिडणार..! जाणून घ्या, तुम्ही ‘हा’ सामना कधी, कुठे आणि Free मध्ये कसा पाहू शकता…

T20 World Cup 2024 (IND vs USA Live Streaming) : टी-20 विश्वचषक 2024 चा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. उभय संघांमध्ये होणारा हा सामना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा दोन संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना खूपच रोमांचक होणार आहे.
वास्तविक, टीम इंडिया आपले पहिले दोन सामने जिंकून येत आहे. अमेरिकन संघानेही पहिले दोन सामने जिंकले आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया फेव्हरिट मानली जात असली तरी टीम इंडिया त्यांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न करणार नाही.
यूएसए विरुद्ध भारत सामना कधी होणार?
टी-20 विश्वचषक 2024 चा यूएसए विरुद्ध भारत सामना बुधवार, 12 जून रोजी रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
कुठे होणार सामना?
टी-20 विश्वचषक 2024 मधील यूएसए विरुद्ध भारत सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे बघायचे?
संपूर्ण टी-20 विश्वचषक 2024 चे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सामन्याचे थेट प्रक्षेपण डिज्नी+हॉटस्टार (Disney + Hotstar) वर उपलब्ध असेल. जिथे तुम्ही डिज्नी+हॉटस्टार (Disney + Hotstar) वर हा सामना विनामूल्य पाहू शकता.
कसा राहिला आहे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील प्रवास ?
टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकला होता. जिथे भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा हा सामना 8 विकेटने जिंकला होता तर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धचा दुसरा सामना 6 धावांनी जिंकला.
गुणतालिकेतील स्थिती…
टीम इंडिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर अमेरिकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, भारत विरूध्द अमेरिका (IND vs USA) या सामन्यातील विजेता संघ थेट सुपर 8 साठी पात्र ठरेल.





