IND vs ENG : केएल राहुलची लॉर्ड्समध्ये कमाल! सेहवाग-अन्वरला मागे टाकत केला मोठा पराक्रम

IND vs ENG KL Rahul break Virender Sehwag Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही चांगली फलंदाजी करत आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने अर्धशतक झळकावले असून तो शानदार फलंदाजी करत आहे. या अर्धशतकी खेळीमुळे त्याने वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वरला मागे टाकले आहे.
केएल राहुलने सेहवागला टाकले मागे –
केएल राहुलने SENA देशांमध्ये आशियाई सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याच्या बाबतीत वीरेंद्र सेहवाग आणि सईद अन्वरला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हे केएल राहुलने १९व्यांदा ५० पेक्षा जास्त केल्या आहेत . SENA देशांमध्ये आशियाई सलामीवीर म्हणून त्याने ११व्यांदा पेक्षा जास्त केल्या. SENA देशांमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावसंख्या करणाऱ्या आशियाई सलामीवीरांचा विक्रम सुनील गावस्करांच्या नावावर आहे. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आता केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. SENA देश म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया.
Fifty for KL Rahul – his 19th in Tests! 👍
A solid knock from the #TeamIndia opener! 💪
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSmBg #ENGvIND | @klrahul pic.twitter.com/Z1Tkn3GMwG
— BCCI (@BCCI) July 11, 2025
SENA देशांमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारे आशियाई सलामीवीर :
- १९ – सुनील गावस्कर
- १२ – दिमुथ करुणारत्ने
- ११ – केएल राहुल*
- १० – वीरेंद्र सहवाग
- १० – सईद अन्वर
- १० – तमिम इक्बाल
हेही वाचा – IND vs ENG : ‘हे जर भारतात झालं असतं ना…’, ड्यूक बॉल वादावरुन सुनील गावस्करांनी ब्रिटिश मीडियाचे टोचले कान
लंच ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या ४ बाद २४८ धावा –
Lunch on Day 3 of the Lord’s Test!
Solid show with the bat from #TeamIndia in the first session, courtesy KL Rahul and Rishabh Pant 💪
A fine 74-run knock by Rishabh Pant comes to an end while KL Rahul is unbeaten on 98* 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#ENGvIND pic.twitter.com/NSXRr7H390
— BCCI (@BCCI) July 12, 2025
आज सकाळी भारताने ३ बाद १४५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी पहिल्या सत्रात शानदार फलंदाजी केली. पंतने अर्धशतक झळकावले, पण धाव चोरताना तो धावबाद होऊन माघारी परतला. पंतने ११२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावा केल्या. पंत आणि राहुल यांच्यात चौथ्या गडीसाठी १४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पंत बाद होताच लंचची घोषणा झाली.
हेही वाचा – Wimbledon 2025 : सेमीफायनलमधील पराभवानंतर जोकोविचचे दुखावले मन, निवृत्तीबद्दल केलं मोठं विधान
केएल राहुल शतकापासून दोन धावा दूर –
केएल राहुलने लंच ब्रेकची घोषणा होईपर्यंत १७१ चेंडूंचा सामना करताना १३ चौकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाने ४ गडी गमावून २४८ धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या सत्रात १०३ धावा जोडल्या आणि फक्त एक गडी गमावला. या सत्रात भारताने ४.५८ च्या सरासरी धावगतीने फलंदाजी केली. केएल राहुल शतकाच्या जवळ पोहोचला आहे. सध्या भारत इंग्लंडच्या पहिल्या डावापेक्षा १३९ धावांनी मागे आहे.





