Mithun Manhas : सेहवागच्या खासगी आयुष्यात वादळ! पत्नीचा मिथुन मन्हाससोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

Mithun Manhas and Sehwag’s wifes affair : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्यातील मतभेदांमुळे दोघेही वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता याबाबत एक नवी आणि धक्कादायक अफवा सोशल मीडियावर पसरत आहे.
वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती ही माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष मिथुन मन्हास यांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. या अफवेला चालना देणारा 2021 मधील मन्हास आणि आरती यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सेहवाग आणि मन्हास यांची मैत्री –
“28 September” is the date when Mithun Manhas became bcci president
Just Saying https://t.co/TNjtaePiZJ pic.twitter.com/DREsQ1l0gK
— Sawai96 (@Aspirant_9457) October 7, 2025
वीरेंद्र सेहवाग आणि मिथुन मन्हास हे दिल्लीच्या क्रिकेट संघातून एकत्र खेळले असून दोघेही जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. अलीकडेच मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, व्हायरल फोटोमुळे या दोघांमधील मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तरीही, या प्रकरणी वीरेंद्र सेहवाग, आरती सेहवाग किंवा मिथुन मन्हास यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, या अफवांना पुष्टी देणारा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.
सेहवाग-आरती यांच्यात मतभेद –
वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांची अनेक वर्षांपासून मैत्री होती आणि 2004 मध्ये त्यांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. निवृत्तीनंतर सेहवाग कुटुंबात रममाण झाला होता, परंतु यावर्षीच्या सुरुवातीला त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. एका व्हायरल व्हिडीओमध्ये सेहवाग आणि आरती कारमध्ये भांडताना दिसले होते. तेव्हापासून दोघांमधील नात्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय, दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचे आणि वेगळे राहत असल्याचेही समोर आले होते.
हेही वाचा – Rohit Sharma : कर्णधारपद गमावल्यानंतर रोहित शर्माच्या पगारात कपात? BCCI चा काय आहे नियम? जाणून घ्या
सध्याची परिस्थिती –
काही वृत्तांनुसार, दोघे लवकरच अधिकृतपणे घटस्फोट घेण्याची शक्यता आहे, असा दावाही करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे सेहवागच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व दाव्यांबाबत कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. सेहवाग किंवा मन्हास यांनी या प्रकरणी मौन बाळगले असून, याबाबत खरे सत्य काय आहे, हे प्रतीक्षेचा विषय आहे.





