चेहऱ्यावर सुज, हाताला पट्टी…; विकी जैन हॉस्पिटलमध्ये दाखल; अंकिता लोखंडे दिसली चिंतेत

समोर आलेल्या फोटोमध्ये, विकी हॉस्पिटलच्या बेडवर असून, त्याच्या हाताला बँडेज बांधलेली दिसत आहे, तर चेहऱ्यावर सूज स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याच्यासोबत अंकिता देखील उभी असल्याचे दिसत आहे, जिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, अद्याप हे समजू शकलेले नाही की त्याला ही दुखापत कशी झाली? मात्र हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी कमेंट करत दुखापत कशी झाली, अशी विचारणा केली आहे. तर काहींनी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन अनेक रियॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले आहेत. आतापर्यंत ‘बिग बॉस 17’, ‘स्मार्ट जोडी’ आणि ‘लाफ्टर शेफ्स: अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या रियॅलिटी शोमध्ये ते एकत्र होते. बिग बॉसमध्ये त्यांच्या नात्याने खूप चर्चा मिळवली होती. सध्या ते ‘लाफ्टर शेफ्स’ सीझन 2 मध्ये दिसत आहेत. या शोमध्ये त्यांच्या केमिस्ट्री आणि विनोदी अंदाजाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. Ankita Lokhande husband Vicky Jain |
हेही वाचा:
Brain eating amoebic infection: केरळमध्ये ‘ब्रेन ईटिंग अमीबा’चा वाढता धोका; सहा जणांचा मृत्यू





