Ankita Lokhande and Vicky Jain : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडपे आहे. दोघेही कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. ‘बिग बॉस 17’ आणि ‘लाफ्टर शेफ्स 2’ च्या माध्यमातूनही या सेलिब्रेटी जोडप्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. आता या जोडप्याने पुन्हा एकदा लग्न करण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे.
अंकिता व विकीने 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई लग्न केले होते. या लग्नाची खूप चर्चा झाली होती. आता पुन्हा दोघे लग्न करू इच्छित आहेत. लवकरच चाहत्यांना या जोडप्याला पुन्हा एकदा फेरे घेताना पाहायला मिळू शकते.
एका मुलाखतीमध्ये बोलताना विकी जैनने पुन्हा लग्न करण्याचे कारण सांगताना सांगितले की, अंकिता नेहमी म्हणते की, मला आपल्या लग्नाच्या सप्तपदी पुन्हा घ्यायच्या आहेत, तो दिवस पुन्हा हवा आहे. आणि तोही त्याच पद्धतीने जिथे आमच्यासाठी खरोखर महत्त्वाचे असलेले लोक सोबत असतील. अनेक नवीन लोकं अजून भेटत आहेत, जे त्यावेळी आमच्या लग्नाला उपस्थित नव्हते. त्यामुळे ती नेहमी याबाबत बोलते. मी देखील हाच विचारात करतो.’
यावर बोलताना अंकिता म्हणाली, ‘पाच वर्षांनंतर आम्ही आमचे लग्न पुन्हा करू.’त्यावर विकीनेही ‘ मला माहित नाही की खरंच पाच वर्षांत होईल की त्यापेक्षा जास्त वर्ष लागतील. आता आपण थेट 50व्या वर्षी करू.”, असे म्हणाला. यावर अंकितानेही ‘मी म्हातारी होईन! मला माझ्या लग्नात सुंदर दिसायचं आहे.’ असे म्हणत विकीला मजेशीर उत्तर दिले.
दरम्यान, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता देशातील प्रत्येक घराघरात पोहोचली. ती रिएल्टी शो ‘बिग बॉस’मध्येही नवऱ्यासोबत सहभागी झाली होती.