रीम शेखला ‘लाफ्टर शेफ्स 2’च्या सेटवर पुन्हा इजा? व्हिडिओद्वारे दिली हेल्थ अपडेट

Reem Sheikh | अभिनेत्री रीम शेख लाफ्टर शेफच्या पहिल्या सीझनमुळे चर्चेत आली होती. या सीझनमध्ये तिच्यासोबत एक अपघात घडला होता. लाफ्टर शेफमध्ये जेवण बनवताना रीम शेखचा चेहरा भाजला होता. तिच्या चेहऱ्यावर अनेक खुणा होत्या. ८ सप्टेंबर रोजी रीमच्या वाढदिवसापूर्वी हा अपघात घडला होता.
आता ती पुन्हा एकदा ‘लाफ्टर शेफ 2’मध्ये काम करत आहे. रीम शेखने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, त्यानंतर असं म्हटलं जात आहे की तिला शोच्या सेटवर पुन्हा दुखापत झाली आहे. यात ती मिरर सेल्फी काढताना दिसत असून तिच्या एका पायाला बँडेज पट्टी बांधलेली आहे. हा फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
यावर रीमने कोणताही अपघात झाला नसून पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर तिनं पायावर पट्टी बांधण्यामागचं कारणही सांगितल आहे. रीम व्हिडिओमध्ये म्हणाली, “माझ्या तब्येतीबद्दल आणि माझ्या पायाची स्थिती कशी आहे, याबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे आभार. माझा पाय पूर्णपणे ठीक आहे. फारसं काही घडलं नव्हतं. आमचं शूट जवळजवळ १६ तास खूप लांबलं. दिवसभर उभी राहिल्यामुळे माझे पाय खूप दुखत होते. म्हणूनच मी माझ्या पायावर गरम पट्टी बांधली, आता माझा पाय पूर्णपणे बरा आहे.”
View this post on Instagram
रीम शेखच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, वयाच्या सहाव्या वर्षी तिने ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या टीव्ही शोमधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिनं ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘तुझसे है राबता’, ‘दिया और बाती हम’ आणि ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ सारखे शो केले आहेत. २०२० मध्ये, तिनं ‘गुल मकाई’ या बायोपिकमध्ये मलालाची भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती सध्या लाफ्टर शेफमध्ये दिसत आहे. Reem Sheikh |
हेही वाचा:
‘बांगलादेशात डेट करू नका किंवा लग्न करू नका…’ ; चीनने त्यांच्या नागरिकांना का केले असे आवाहन?





