Political News : तृणमूलचे बंडखोर खासदार भाजपमध्ये होणार विलीन? सुवेंदू अधिकारी भेट घेण्याची शक्यता
Political News : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसत आहेत.

Political News : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी उद्या (मंगळवार) दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यावेळी त्यांची तृणमूल कॉंग्रेसच्या २० बंडखोर खासदारांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोर खासदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. (Political News)
बंगालची सत्ता गमावल्यानंतर तृणमूलमध्ये आमदार आणि खासदारांच्या स्तरावर फूट पडली. बंडखोर खासदारांनी फारशा ज्ञात नसलेल्या एनसीपीआय या पक्षात प्रवेश केला. त्या कृतीला अद्याप लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मान्यता दिलेली नाही. (Political News)
मात्र, बंडखोर खासदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तवली जात आहे. त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि बंडखोर खासदारांच्या प्रस्तावित भेटीचे महत्व वाढले आहे. (Political News)
बंडखोर खासदारांच्या गटाचे नेतृत्व सुदिप बंडोपाध्याय आणि काकोली घोष दस्तिदार हे ज्येष्ठ नेते करत आहेत. त्या गटाने प्रवेशासाठी निवडलेला एनसीपीआय पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक बनला आहे. आता तो गट भाजपमध्ये विलीन होणार का याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Political News)
Political News : भाजपच्या कार्यालयावर ‘पेट्रोल बॉम्ब’ने हल्ला; राज्यात खळबळ
Political News : मोठी बातमी..! माजी मुख्यमंत्र्यांचा राजकारणातून तडकाफडकी सन्यास, राजकारणात खळबळ





