Political News : भाजपच्या कार्यालयावर ‘पेट्रोल बॉम्ब’ने हल्ला; राज्यात खळबळ
Political News : संगरूर येथील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मुख्य कार्यालयावर अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री 'पेट्रोल बॉम्ब' फेकून हल्ला केला.

Political News : पंजाबमधील संगरूर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंगही फवारण्यात आल्याचे समोर आले आहे. (Political News)
या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू केला.
संगरूरचे एसपी (डी) दविंदर अत्री यांनी डीएसपी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. त्यांच्या माहितीनुसार, बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून त्याचा पेट्रोल बॉम्ब म्हणून वापर करण्यात आला होता. (Political News)
पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून शहरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. (Political News)
#WATCH | Sangrur, Punjab: Davinder Atri (SP-D Sangrur) says, “…DSP, Sangrur SHO and I reached here. We are inspecting the spot. Petrol was filled in a beer bottle to convert it into a petrol bomb…We are lodging an FIR against the culprits, and we will take action againt… https://t.co/94cd7f1ktE pic.twitter.com/pTEnZhUPAy
— ANI (@ANI) July 27, 2026
एसपी दविंदर अत्री यांनी सांगितले की, “दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Political News)
या घटनेमुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप कार्यालयावरील या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. (Political News)
Political News : दुःखद बातमी..! एकाच दिवशी दोन दिग्गज नेत्यांचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ




