Suspension of Congress MLA : ओडिसामध्ये मोठी घडामोड ! काँग्रेसकडून ‘या’ 3 आमदारांचे निलंबन
ओडिसामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याप्रकरणी काँग्रेसने (Suspension of Congress MLA) आपल्या तीन आमदारांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे.

Suspension of Congress MLA : ओडिसामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याप्रकरणी काँग्रेसने (Suspension of Congress MLA) आपल्या तीन आमदारांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. रमेश चंद्र जेना (सनखेमुंडी), दशरथी गोमांगो (मोहना) आणि सोफिया फिरदौस (बाराबती-कटक) अशी निलंबित (Suspension of Congress MLA) आमदारांची नावे आहेत.
सोमवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या आमदारांनी भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले. काँग्रेसने बीजेडीचे उमेदवार दत्तेश्वर होता यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या तीन आमदारांच्या फुटीमुळे काँग्रेस आणि बीजेडीच्या संयुक्त उमेदवाराचा पराभव झाला आणि दिलीप राय विजयी झाले.
प्रदेश काँग्रेसने या आमदारांच्या कृतीवर (Suspension of Congress MLA) तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पक्षाशी गद्दारी करणे म्हणजे राष्ट्राशी गद्दारी करण्यासारखे आहे, असे सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी सांगितले की, या आमदारांकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाचे राजकीय नुकसान झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.






