Suryakumar Yadav : विश्वविजेता कर्णधार सूर्या लवकरच होणार बाबा! पत्नी देविशा शेट्टीच्या बेबी शॉवरचा VIDEO होतोय व्हायरल
Suryakumar Yadav : सूर्याची पत्नी देविशा शेट्टी हिच्या 'बेबी शॉवर'चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Suryakumar Yadav Devisha Shetty Baby Shower : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या यशाच्या शिखरावर आहे. ८ मार्च रोजी भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर आता सूर्या लवकरच बाबा होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. सूर्याची पत्नी देविशा शेट्टी हिच्या ‘बेबी शॉवर’चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हात धरून शाही थाटात हॉलमध्ये प्रवेश –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव पांढऱ्या रंगाच्या नक्षीदार कुर्त्यामध्ये अत्यंत देखणा दिसत आहे, तर देविशाने दाक्षिणात्य पद्धतीची सुंदर साडी परिधान केली आहे. सूर्या आपल्या पत्नीचा हात धरून शाही थाटात हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच देविशा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, त्यावर आता या व्हिडिओमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
१० वर्षांची साथ आणि कॉलेजमधील प्रेम –
Baby shower of Suryakumar Yadav and Devika 😍❤️ pic.twitter.com/rYudGduOPE
— Jeet (@JeetN25) March 14, 2026
सूर्या आणि देविशा यांच्या लग्नाला आता १० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ७ जुलै २०१६ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. त्यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटासारखी आहे. मुंबईतील पोदार महाविद्यालयात असताना त्यांची पहिली भेट झाली होती. देविशाचे नृत्य पाहून सूर्या तिच्या प्रेमात पडला होता. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, लग्नाच्या ५ वर्षांनंतर सूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आज तो जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाज व यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.
सूर्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ११३ टी-२० सामन्यांत ३२७२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा १६२.९५ चा स्ट्राईक रेट जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय असतो. तसेच त्याने ३७ एकदिवसीय आणि १ कसोटी सामनाही खेळला आहे. आता मैदानावरील या ‘३६० डिग्री’ फलंदाजाला आयुष्याच्या मैदानावर नवी इनिंग सुरू करण्यासाठी सर्वच स्तरांतून शुभेच्छा मिळत आहेत.





