Naman Awards 2026 : BCCI नमन अवॉर्ड्स २०२६ मध्ये शुबमन-स्मृतीसह या खेळाडूंचा राहिला दबदबा! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Naman Awards 2026 : या सोहळ्यात भारतीय क्रिकेटचे माजी दिग्गज राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि महिला क्रिकेटची 'लेडी सचिन' मिताली राज यांना अत्यंत प्रतिष्ठेचा 'कर्नल सी. के. नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' देऊन गौरवण्यात आले.

BCCI Naman Awards 2026 Winners : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या कष्टाचे आणि यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘नमन अवॉर्ड्स २०२६’ मध्ये पुरस्कारांचा वर्षाव झाला. या सोहळ्यात भारतीय क्रिकेटचे माजी दिग्गज राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि महिला क्रिकेटची ‘लेडी सचिन’ मिताली राज यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘कर्नल सी. के. नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले.
शुबमन आणि स्मृतीचा दबदबा –
🚨 𝗣𝗼𝗹𝗹𝘆 𝗨𝗺𝗿𝗶𝗴𝗮𝗿 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 🚨
Dominating attacks and delivering big runs when it mattered most 🫡
Congratulations to #TeamIndia captain Shubman Gill on being named 𝐁𝐞𝐬𝐭 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐂𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭𝐞𝐫 – 𝐌𝐞𝐧 🏆👏#NamanAwards | @ShubmanGill pic.twitter.com/IozcgwWyOD
— BCCI (@BCCI) March 15, 2026
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुबमन गिल याला २०२४-२५ हंगामासाठी पुरुषांमधील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू’ (पॉली उमरीगर अवॉर्ड) म्हणून निवडण्यात आले. महिलांमध्ये हा बहुमान स्मृती मानधनाने पटकावला. स्मृतीने पाचव्यांदा हा पुरस्कार जिंकून आपली सातत्यपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
1⃣8⃣0⃣0⃣ runs
3⃣6⃣ matches
7⃣ centuriesElegance, consistency and a year to remember ✨#TeamIndia vice-captain Smriti Mandhana bags the 𝐁𝐞𝐬𝐭 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐂𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭𝐞𝐫 – 𝐖𝐨𝐦𝐞𝐧 award for the 5⃣th time 🏆👏#NamanAwards | @mandhana_smriti pic.twitter.com/u9KlB1CTON
— BCCI (@BCCI) March 15, 2026
हर्षित राणाचाही गौरव –
A phenomenal start to a promising journey in international cricket 🔥🔥
🔹 𝗕𝗲𝘀𝘁 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗗𝗲𝗯𝘂𝘁 – 𝗠𝗲𝗻
The award goes to the fearless Harshit Rana 👏👏#NamanAwards pic.twitter.com/t42gUQ1XDe
— BCCI (@BCCI) March 15, 2026
वेगवान गोलंदाज हर्षित राणाला पुरुषांमध्ये आणि श्री चरणी हिला महिलांमध्ये ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण’ (Best Debut) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हर्षित राणा दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजयी संघाचा भाग बनू शकला नव्हता, मात्र त्याच्या प्रतिभेची दखल बीसीसीआयने घेतली आहे. घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईच्या आयुष म्हात्रे याला अष्टपैलू कामगिरीसाठी ‘लाला अमरनाथ पुरस्कार’ मिळाला.
पुरस्कार विजेत्यांची यादी (ठळक):
- लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड: राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज.
- बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर : शुबमन गिल (पुरुष) स्मृती मानधना (महिला)
- बेस्ट इंटरनॅशनल डेब्यु: हर्षित राणा (पुरुष) आणि श्री चरणी (महिला).
- सर्वाधिक विकेट्स (महिला वनडे): दीप्ति शर्मा.
- रणजी ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स (एलिट): हर्ष दुबे (विदर्भ).
- रणजी ट्रॉफी सर्वाधिक धावा (एलिट): यश राठोड (विदर्भ).
- घरगुती क्रिकेट सर्वोत्तम अंपायर: उल्हास गांधे.





