Suryakumar Yadav Dance : मैदानावरचा ‘धुरंधर’ आता डान्स फ्लोअरवर! अक्षय खन्नाच्या ‘त्या’ गाण्यावर सूर्याचा जलवा
Suryakumar Yadav Dance : सूर्यकुमार यादव (SKY) याने पहिल्या भागातील अक्षय खन्नाच्या आयकॉनिक डान्स स्टेप्स रिक्रिएट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Suryakumar Yadav Dhurandhar Dance Video : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता त्याच्या सिक्वेलची म्हणजेच ‘धुरंधर २’ ची जादू प्रेक्षकांवर पाहायला मिळत आहे. एकीकडे चित्रपटगृहात रणवीर सिंहच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (SKY) याने पहिल्या भागातील अक्षय खन्नाच्या आयकॉनिक डान्स स्टेप्स रिक्रिएट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या सर्वत्र ‘धुरंधर २’ ची चर्चा सुरू असतानाच, टीम इंडियाचा ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादव याचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागात अक्षय खन्नाने ‘FA9LA’ या गाण्यावर केलेल्या अनोख्या डान्स स्टेप्स प्रचंड गाजल्या होत्या. आता त्याच गाण्यावर सूर्यकुमार यादवने हुबेहूब स्टेप्स करत चाहत्यांना थक्क केले आहे. एका कार्यक्रमात स्टेजवर जाताना सूर्याने दाखवलेला हा स्वॅग पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.
मुंबई इंडियन्सचा ‘धुरंधर’ मोड ऑन!
View this post on Instagram
आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “ही दादाची स्टाईल आहे. धुरंधर मोड ऑन,” असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. अक्षय खन्नाने पहिल्या भागात ज्या आत्मविश्वासाने आणि स्टाईलने डान्स केला होता, तोच अंदाज सूर्यकुमारच्या डान्समध्ये पाहायला मिळत असल्याने नेटकऱ्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘धुरंधर २’ चा बॉक्स ऑफिसवर डंका
दुसरीकडे, चित्रपटगृहात रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी होत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या भागालाही जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या भागात अक्षय खन्नाच्या संवादांनी आणि डान्सने सोशल मीडिया गाजवले होते, तर दुसऱ्या भागात रणवीर सिंहच्या कामाची दाद घेतली जात आहे. सूर्यकुमारच्या या व्हिडीओमुळे चित्रपटाच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून क्रिकेट आणि बॉलीवूडचे हे अनोखे समीकरण चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.





